आयपीएल (IPL) पूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) एम. ए चिदंबरम स्टेडियममध्ये सुरु झालेल्या सराव सत्रात कर्णधार महेंद्र सिंह धोनीचे (Mahendra Singh Dhoni) स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांनी धमाकेदार स्वागत केले. मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वनडे विश्वचषकनंतर धोनीने क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घेतली आहे. निवृत्तीच्या चर्चांमध्ये धोनीने इंडियन प्रीमियर लीगमधून (Indian Premier League) क्रिकेटमध्ये परतण्याचा निर्णय जाहीर केला. आणि आता धोनीने आयपीएल 2020 ची तयारी सुरू केली आहे. त्याने चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर सराव सुरू केला आहे. आपल्या आवडत्या टीमला सराव चाहतेही स्टेडियममध्ये पोहचले होते. धोनी जसा मैदानावर आला चाहत्यांनी जोरात जयजयकार करण्यास सुरवात केली.तो दोन बॅट घेऊन फलंदाजीसाठी नेट्समध्ये आला. त्याने काही जोरदार शॉट्स खेळून चाहत्यांना आश्चर्यचकित केले. (IPL 2020: एमएस धोनी प्रशिक्षण शिबीरासाठी चेन्नईमध्ये दाखल, सोशल मीडियावर नवीन रूपाची चर्चा, Photo)
चेन्नई फ्रॅन्चायसीने धोनीच्या सरावाचा व्हिडिओ शेअर केला. सोमवारी सरावा दिवशी, जेव्हा तो मैदानावर उतरला तेव्हा स्टेडियममध्ये धोनी-धोनीचा नावाचा गजर ऐकू आला. धोनी त्याच्या कारकीर्दीविषयी करण्यात अनुमान बांधले जात असताना सरावासाठी पोहोचला होता. गेल्या आठ महिन्यांपासून धोनी कोणताही सामना खेळला नाही. पाहा विडिओ:
A grand waltz to take guard! #StartTheWhistles #SuperTraining 🦁💛 pic.twitter.com/tQbDqqnmT2
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 2, 2020
दरम्यान सोमवारी अंबाती रायुडू, मुरली विजय, पियुष चावला, कर्ण शर्मा, आर साई किशोर आणि एन जगदीशन यांनी धोनी व्यतिरिक्त नेट्समध्ये सराव केला. आयपीएल 2020 च्या सुरुवातीचा सामना 29 मार्च रोजी गतजेत्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये वानखेडे स्टेडियममध्ये खेळलावे जाईल. धोनी सोमवारी (2 मार्च) चेन्नईला पोहोचला. चेन्नईमध्ये धोनीचे भव्य स्वागत झाले. आयपीएल सुरू होण्यापूर्वी चेन्नईचे अनेक खेळाडू आणि प्रशिक्षक चेन्नई येथे प्रशिक्षणासाठी पोहोचले आहेत. चेन्नई सुपर किंग्जने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून धोनीच्या स्वागताचा व्हिडिओ शेअर केला आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने तीन वेळा आयपीएलचे जेतेपद जिंकले आहे. दुसरीकडे, वर्षअखेरीस ऑस्ट्रेलियामध्ये होणार टी-20 विश्वचषकमध्ये भारतीय संघात धोनीचा समावेश त्याच्या फॉर्मवर अवलंबून असेल.