
Sunrisers Hyderabad vs Punjab Kings IPL 2025: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 27 वा सामना 12 एप्रिल (शनिवार) रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज (SRH vs PBKS) यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा 6 गडी राखून पराभव केला आहे. त्याआधी, पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत हैदराबादसमोर ठेवले 246 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबादने 18.3 षटकात लक्ष्य गाठले. त्यासाठी अभिषेक शर्माने स्फोटक शतक झळकावले.
Incredible. Audacious. OUTSTANDING 🙌
The second-highest chase in IPL history 🥶 pic.twitter.com/eL6c37bZe6
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 12, 2025
श्रेयस अय्यरची बॅट गर्जली
प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जच्या संघाने निर्धारित 20 षटकांत सहा गडी गमावून 245 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून कर्णधार श्रेयस अय्यरने 82 धावांची शानदार खेळी केली. या शानदार खेळीदरम्यान, श्रेयस अय्यरने फक्त 36 चेंडूत सहा षटकार आणि सहा चौकार लगावले. श्रेयस अय्यर व्यतिरिक्त, सलामीवीर प्रभसिमरन सिंगने 42 धावा केल्या. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादकडून हर्षल पटेलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. हर्षल पटेल व्यतिरिक्त इशान मलिंगाने दोन विकेट घेतल्या.
अभिषेक शर्माची 141 धावांची वादळी खेळी
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाने 18.3 षटकांत केवळ दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. सनरायझर्स हैदराबादकडून स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माने सर्वाधिक 141 धावांची खेळी केली. या धमाकेदार खेळीदरम्यान अभिषेक शर्माने 55 चेंडूत 14 चौकार आणि 10 षटकार मारले. अभिषेक शर्मा व्यतिरिक्त, ट्रॅव्हिस हेडने जलद 66 धावा केल्या. त्याच वेळी, पंजाब किंग्जकडून युजवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. युजवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंग वगळता इतर कोणत्याही गोलंदाजाला विकेट मिळाली नाही.