SRH vs PBKS (Photo Credit - X)

Sunrisers Hyderabad vs Punjab Kings IPL 2025: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 27 वा सामना 12 एप्रिल (शनिवार) रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज (SRH vs PBKS) यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली, सनरायझर्स हैदराबादने सलग चार सामने गमावले आहेत आणि आता संघ पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. संघाने पाच पैकी चार सामने जिंकले आहेत आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध फक्त एक सामना गमावून पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे.

किती वाजता सुरु होणार सामना?

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज आयपीएल 2025 चा 25 वा सामना शनिवार, 12 एप्रिल रोजी खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. या सामन्यात दोन्ही संघांचे कर्णधार टॉसच्या अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी 7 वाजता मैदानावर असतील. (हे देखील वाचा: SRH vs PBKS TATA IPL 2025, Hyderabad Weather Forecast: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्यात पावसाचा व्यत्यय? कसे असेल हैदराबादचे हवामान?)

कुठे पाहणार लाईव्ह सामना?

भारतीय चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्क तसेच स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर टीव्हीवर SRH विरुद्ध PBKS आयपीएल 2025 चा 27 वा सामना थेट पाहू शकतील. येथे वेगवेगळ्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये समालोचन ऐकण्यासाठी उपलब्ध असेल. तसेच सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही JioHotstar वर पाहू शकाल. येथे तुम्हाला हिंदी आणि इंग्रजीसह अनेक भारतीय भाषांमध्ये समालोचन ऐकायला मिळेल.