माजी भारतीय क्रिकेटर सुनील गावस्कर (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचे उत्तम प्रकारे नेतृत्व केल्याबद्दल भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी रिषभ पंतवर (Rishabh Pant) कौतुकाचा वर्षाव केला. भारतीय संघाचा सर्वोत्कृष्ट कर्णधार होण्यासाठी जे पाहिजे ते 23 वर्षीय युवा क्रिकेटपटूकडे असल्याचे क्रिकेटपटू-भाष्यकाराने म्हटले. श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएल (IPL) हंगामासाठी पंतकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. आणि पंतच्या नेतृत्वात दिल्लीने 8 पैकी 6 सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत आघाडीवर राहिली होती. कर्णधार म्हणून पंतच्या स्वभावाचेही दिग्गज फलंदाजाने कौतुक केले. पंत शिकण्यास उत्सुक आहेत ही वस्तुस्थिती त्यांनी नमूद केली. Sportstar मधील आपल्या ताज्या लेखात गावस्कर यांनी नमूद केले की पंतने आयपीएल 2021 मध्ये ‘स्पार्क’ दाखवला जी ‘आग’ बनू शकते. (ICC WTC Final: न्यूझीलंडला धूळ चारण्यासाठी टीम इंडियासाठी हा खेळाडू ठरू शकतो ट्रम्प कार्ड, ऑस्ट्रेलिया-इंग्लंड संघाना लोळवले आहे)

“युवा रिषभ पंतच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्स स्टँडआउट टीम राहिली. सहाव्या सामान्यांपर्यंत कर्णधारपदाबद्दल विचारले असता त्याला कंटाळा आला होता हे दिसून येत होते. सामना नंतरच्या सोहळ्यातील प्रत्येक सादरकर्त्याकडे त्याला विचारण्यासाठी एकच प्रश्न होता. त्याने जे दाखवले ती म्हणजे एक ठिणगी आहे जी नैसर्गिकरित्या वापरली तर ती अग्नी बनू शकते. हो, तो चुका करेल; कोणता कर्णधार नाही करत?” गावस्कर यांनी स्पोर्टस्टारसाठी आपल्या लेखात लिहिले. “पण जसे त्याने आयपीएलमधील काही खेळांमध्ये दाखवून दिले की तो शिकण्यास पुरेसा हुशार आहे आणि त्याच्या नेहमीच्या स्ट्रीट-स्मार्ट सेव्ही म्हणजेच तो बर्‍याच परिस्थितींमध्ये आघाडीवर आहे आणि बिकट स्थितीतून बाहेर पडण्याची आपली पद्धत शोधत आहे. तो भविष्यासाठी एक आहे, याबद्दल शंका नाही. कारण त्याने हे दाखवून दिले आहे की प्रतिभेला संधी तेव्हा मिळते जेव्हा ती स्वभावाचा हात धरून जाते,” त्यांनी पुढे म्हटले.

दरम्यान, कर्णधार म्हणून पदार्पणाच्या आयपीएल हंगामात पंतने पंतने बॅटने देखील चांगली सुरुवात केली होती. त्याने 8 सामन्यांत 35 पेक्षा अधिकच्या सरासरीने 213 धावा केल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 131.48 होता. आयपीएल 2021 च्या बायो बबलमध्ये कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली.