सुनील गावस्कर, रोहित शर्मा (Photo Credit: PTI, Twitter)

मुंबई इंडियन्सला मंगळवारी रात्री गतविजेत्या गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव स्वीकारावा लागला. अहमदाबाद येथे झालेल्या सामन्यात संघाचा 55 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सची फलंदाजी खूपच निराशाजनक होती. मुंबई इंडियन्सचा हा चौथा पराभव असून तो सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी संघाच्या फलंदाजीच्या क्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) काही सामन्यांसाठी विश्रांती घेण्याचा सल्लाही दिला आहे. गावस्कर असे म्हणण्यामागचे कारण म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप. (हे दखील वाचा: RCB vs KKR: आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात लढत, जाणून घ्या दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन)

सुनील गावस्कर यांनी रोहितला विश्रांतीचा दिल्ला सल्ला

स्टार स्पोर्ट्सवर बोलताना गावस्कर म्हणाले, 'मला मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीच्या क्रमात काही बदल पाहायला आवडतील. खरे सांगायचे तर, रोहित शर्माने काही काळ विश्रांती घ्यावी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी स्वत:ला तंदुरुस्त ठेवावे अशी माझी इच्छा आहे. यानंतर तो शेवटच्या काही सामन्यांसाठी पुनरागमन करू शकतो. पण सध्या त्याला छोट्या विश्रांतीची नितांत गरज आहे. सध्या तो खूप अस्वस्थ दिसत आहे. कदाचित तो यावेळी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विचार करत असेल, मला माहीत नाही. त्याच्या मते आता अनेक चमत्कारच मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये घेऊन जाऊ शकतात.

सामन्याबद्दल थोडक्यात

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 6 गडी गमावून 207 धावा केल्या. गुजरातकडून अभिनव मनोहर आणि डेव्हिड मिलर यांनी वेगवान खेळी खेळल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सचा संघ 20 षटकांत 9 गडी गमावून 152 धावाच करू शकला. मुंबई इंडियन्सकडून नेहल वढेराने 21 चेंडूत सर्वाधिक 40 धावा केल्या.