Stuart Binny (Photo Credits: IANS)

भारताचा ऑलराऊंडर खेळाडू स्टुअर्ट बिन्नी (Stuart Binny) याने क्रिकेट विश्वातून निवृत्ती घेत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. आज (30 ऑगस्ट) स्टुअर्ट ने सार्‍या फॉर्मेट मधून संन्यास घेत असल्याचं जाहीर केले आहे. 37 वर्षीय बिन्नी मागील अनेक महिन्यांपासून टीम पासून दूर होता. 2016 नंतर त्याने कोणत्याही इंटरनॅशनल सामना खेळला नव्हता. दरम्यान तो डोमॅस्टिक क्रिकेट द्वारा टीममध्ये पुन्हा प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. 2012 साली न्युझिलंड विरूद्ध वनडे मॅच द्वारा त्याने पदार्पण केले होते.

स्टुअर्ट बिन्नी हा दिग्गज भारतीय क्रिकेटर रोजर बिन्नी यांचा मुलगा आहे. त्याने 6 टेस्ट, 14 वनडे आणि 3 टी20 मॅच खेळल्या आहेत. त्याच्या नावावर वनडे क्रिकेट मध्ये भारताकडून सर्वश्रेष्ठ गोलंदाजीचा रेकॉर्ड आहे. 2014 मध्ये बांग्ला देश विरूद्ध त्याने 4 रन देऊन 6 विकेट घेतल्या होत्या. त्याचा हा रेकॉर्ड अद्याप कोणताही भारतीय गोलंदाज मोडू शकलेला नाही.

स्‍टुअर्ट बिन्‍नी आपल्या वडिलांप्रमाणेच लोअर मिडल ऑर्डर मध्ये हार्ड हिटिंग फलंदाज होता. सुरूवातीला बिन्नी कर्नाटकच्या टीममध्ये जागा मिळवण्यासाठी संघर्ष करत होता. 2007 साली त्याला भारतीय क्रिकेट लीग साठी करारबद्ध करण्यात आले. तो हैदराबाद हिरोज आणि इंडिया इलेवन साठी खेळला. 2013 साली साऊथ आफ्रिका दौर्‍यासाठी त्याला भारतीय ए टीम मध्ये निवडण्यात आले. तेथील शानदार काम्गिरीनंतर पुढील वर्षीच त्याची भारतीय संघात वनडे मॅच मध्ये पदार्पणाची संधी मिळाली.