
Steve Smith Retires from ODI Cricket: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या (Champions Trophy 2025) उपांत्य फेरीत टीम इंडियाविरुद्ध पराभव झाल्यानंतर, ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) निवृत्तीची घोषणा केली आहे. पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथ संघाचा कर्णधार होता. परंतु त्याच्या नेतृत्वाखाली संघ फक्त उपांत्य फेरीपर्यंत पोहोचू शकला. अशा परिस्थितीत आता त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तो ऑस्ट्रेलियासाठी कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत राहील.
स्टीव्ह स्मिथने 19 फेब्रुवारी 2010 रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले आणि 4 मार्च 2025 रोजी भारताविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. या 15 वर्षांत त्यांने अनेक चमकदार कामगिरी केल्या. त्याने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात दोन विकेट घेतल्या होत्या. तर, भारताविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने 96 चेंडूत 73 धावांची खेळी केली होती.
JUST IN: Steve Smith has announced his decision to retire from ODIs following Australia's exit from Champions Trophy. pic.twitter.com/F2Oh201pV4
— Cricbuzz (@cricbuzz) March 5, 2025
डावखुरा फलंदाज स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियासाठी 169 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 153 डावांमध्ये तो एकूण 5727 धावा करण्यात यशस्वी झाला. त्याची सर्वोच्च धावसंख्या 164 आहे. या फॉरमॅटमध्ये त्याची सरासरी 43.06 आहे. तर, स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 78.13 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 12 शतके आणि 34 अर्धशतके आहेत. तो 20 वेळा नाबाद परतला आहे. त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 517 चौकार आणि 57 षटकार मारले आहेत.