प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

श्रीलंकेचा (Sri Lanka) टी-20 विश्वचषक विजेता वेगवान गोलंदाज नुवान कुलसेकरा (Nuwan Kulasekara) यांनी बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तत्काळ निवृत्ती जाहीर केली आहे. श्रीलंका मीडियामध्ये कुलसेकराच्या निवृत्तीची बातमी समोर आली आहे. 37 वर्षीय कुलसेकरा श्रीलंकेच्या आयसीसी विश्वचषक 2019 संघाचा भाग नव्हता. कुलसेकराने 2017 मध्ये राष्ट्रीय संघासाठी अंतिम सामना खेळला होता. तर मार्च 2018 पासून कुलासेकरा वरिष्ठ पातळीवर एकही स्पर्धात्मक क्रिकेट खेळाला नाही. चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्याच्या क्षमतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या कुलसेकरा मर्यादित ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये श्रीलंके यशस्वी गोलंदाज होता. कुलसेकराने श्रीलंकेसाठी 184 वनडे सामने खेळले. यात त्याने 4.90 च्या सरासरीने 199 विकेट घेतल्या. (वनडे क्रिकेटमध्ये नाही दिसणार लसिथ मलिंगाची जादू, बांग्लादेशविरुद्ध मालिकानंतर निवृत्तीची केली घोषणा)

दुसरीकडे, नुकतेच श्रीलंकेचा 'यॉर्कर' गुरु लसिथ मलिंगा (Lasith Malinga) याने वनडेमधून निवृत्ती घोषित केली आहे. 26 जुलै रोजी श्रीलंका आणि बांग्लादेश (Bangladesh) यांच्यादरम्यान पहिल्या वनडे सामन्यानंतर मलिंगा एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होत आहे.

दरम्यान, कुलसेकराने करिअरमध्ये फक्त 21 टेस्ट सामने खेळल्यावर 2016 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 2003 साली वयाच्या 21व्या वर्षी वनडे संघात पदार्पण केले होते. दोन वर्षानंतर त्याने कसोटीत पदार्पण केले. श्रीलंकासाठी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केल्याच्या एक वर्षानंतर 2008 मध्ये आयसीसी (ICC) गोलंदाजांच्या क्रमवारीत कुलशेखरा क्रमांक 1 स्थानावर पोहोचला. कुलसेकरा श्रीलंकेच्या 3 विश्वचषक संघाचा भाग होता. आणि त्याने 2 विश्वचषक अंतिम सामने खेळले. कुलसेकराबद्दल एक गोष्ट जी कोणीच विसरू शकणार नाही, अगदी भारतीय देखील. 2011च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीनं मारलेला तो विजयी षटकार हा नुवानच्याच गोलंदाजीवर मारला होता. त्यावेळी कुलसेकरा श्रीलंकेसाठी सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 8.2 ओव्हरमध्ये 64 धावा दिल्या होत्या.