लसिथ मलिंगा (फोटो सौजन्य-PTI)

श्रीलंकेचा (Sri Lanka) अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगा (Lasith Malinga) आगामी बांग्लादेश (Bangladesh) वनडे मालिकानंतर क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. 26 जुलैपासून बांग्लादेश आणि श्रीलंका दरम्यान 3 एकदिवसीय सामने खेळले जातील. श्रीलंका संघाचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने (Dimuth Karunaratne) यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. मलिंगाला श्रीलंकेच्या 22 सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे. या मालिकेचे सर्व सामने कोलंबो (Colombo) च्या आर प्रेमदास स्टेडियमवर 26, 28 आणि 31 दरम्यान खेळले जातील. पण, संघाच्या पत्रकार परिषदेत, करुणरत्नने याने म्हटले की 36 वर्षीय मलिंगा केवळ पहिल्या सामन्यात खेळेल.

"ते पहिला सामना खेवर आहे. आणि त्यानंतर तो निवृत्ती घेत आहे. त्यांनी मला हेच सांगितले. त्यांनी निवड समितीला काय सांगितले ते मला ठाऊक नाही, पण त्यांनी मला सांगितले की ते फक्त एक सामना खेळणार,"करुणारत्ने यांनी पत्रकारांना सांगितले.  दरम्यान, मलिंगाने सर्व चाहत्यांना आपला शेवटचा वनडे सामना बंघण्यासाठी कोलंबोच्या क्रिकेट स्टेडियममध्ये आमंत्रित केले आहे. मलिंगाच्या निवृत्तीची बातमी कळताच त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्याला शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, आपल्या वनडे करिअरमध्ये मलिंगाने श्रीलंकेसाठी 225 सामने खेळले आहे. यात त्यांनीं 335 विकेट्स घेतले आहे. 35 वर्षीय मलिंगा, वनडे क्रिकेटमध्ये श्रीलंकेचा तिसरा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू म्हणून निवृत्त होणार आहे. मलिंगा शिवाय, मुथय्या मुरलीधरन आणि चमिंडा वास यांनी श्रीलंकेसाठी वनडे सामन्यात अधिक बळी घेतले आहेत. मुरलीधरनने 523 तर वास याने 399 विकेट्स घेतल्या आहेत. शिवाय, मलिंगा विश्वचषकमध्ये सर्वात जलद 50 विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. आयसीसी क्रिकेट विश्वचषकमध्ये मलिंगाने 57 विकेट्स घेतले आहे. यात दोन हॅट-ट्रिक देखील शामिल आहे.