Southampton Weather Update: भारत-न्यूझीलंड ICC WTC फायनल सामन्याच्या पहिल्या दिवसावर पावसाचे पाणी, राखीव दिवसपर्यंत चालणार महामुकाबला
साऊथॅम्प्टन हवामान अपडेट (Photo Credit: Twitter/ICC)

Southampton Weather Update: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) अंतिम सामन्याची निराशाजनक सुरुवात झाली. सतत पाऊस आणि खराब वातावरणामुळे अंपायरना शुक्रवारी साऊथॅम्प्टन (Southampton) येथे विजेतेपदाचा पहिला दिवस रद्द करावा लागला. पावसामुळे टॉस उशिरा होण्याची माहिती सामना अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिली ज्यानंतर पावसाने दिवसावर राज्य केले आणि शेवटी दिवसाच्या खेळावर पाणी फेरले. आता रोज बाउल  (Rose Bowl) स्टेडियमवर हवामानाची कृपा राहिल्यास नाणेफेक दुसर्‍या दिवशी होईल. दुसऱ्या दिवसाचा खेळ स्थानिक वेळ सकाळी 10.30 म्हणजे भारतीय वेळेनुसार दुपारी 3:00 वाजता सुरु होईल. (IND vs NZ WTC Final 2021: टीम इंडियावर Michael Vaughan यांनी पुन्हा साधला निशाणा, म्हणाले- ‘पावसाने भारताला वाचवले’)

दरम्यान, आयसीसीने पहिले सत्र संपल्याची माहिती दिली तेव्हा आणि अभिव्यक्त हवामान परिस्थितीची जाणीव असतानाही इंग्लंडमध्ये महत्वाचा सामना आयोजित केल्याबद्दल प्रशासकीय समितीकडे नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर यूजर्सने नाराजी व्यक्त केली. लक्षात घेण्यासारखे म्हणजे आयसीसीने डब्ल्यूटीसी फायनलसाठी राखीव दिवस ठेवला आहे ज्याचा वापर पाऊस किंवा खराब प्रकाशामुळे वाया गेलेल्या वेळेची केला जाईल. साउथॅम्प्टनमध्ये पावसाची संततधार सुरु असल्याने पहिल्या दिवशी एकाही ओव्हरचा खेळ होऊ शकला नाही. आयसीसीने साऊथॅम्प्टन हवामान लक्षात घेता राखीव दिवसाचा नियम लागू केला होता. त्यामुळे 18 ते 22 जून दरम्यान हा सामना खेळवला जाणार असला, तरी 23 जून काही वेळ वाया गेल्यास सामन्यासाठी निर्धारित केला गेला होता. आता पहिल्या दिवसाचे दोन सत्र वाया गेल्याने हा नियम लागू झाला आहे. त्यामुळे 23 जूनला देखील चाहत्यांना सामना पाहायला मिळू शकतो. मात्र सामना अधिकारी याबाबत निर्णय घेतील.

दुसरीकडे, इंग्लंडमधील हवामान किंवा खराब वातावरणामुळे जर अंतिम सामना ड्रॉ, टाय किंवा अनिर्णित राहिला तर भारत-न्यूझीलंड संघाना संयुक्त विजेता म्हणून घोषित केले जाईल. विजेत्या संघाला 1.6 लाख अमेरिकी डॉलर्स तर उपविजेता संघाला 800,000 डॉलर्सची रक्कम दिली जाईल. तसेच सामना अनिर्णित किंवा ड्रॉ झाल्यास विजेत्यांची रक्कम दोन्ही संघात बरोबरीने वाटली जाईल.