
South Africa Women's National Cricket Team vs India Women's National Cricket Team 5th ODI 2025 Live Streaming: दक्षिण आफ्रिका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND-W vs SA-W) एकदिवसीय तिरंगी मालिकेचा 5वा सामना 7 मे (बुधवार) रोजी कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल. दक्षिण आफ्रिका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघांचे लॉरा वोल्वार्ड नेतृत्व करत आहे. तर हरमनप्रीत कौर भारत महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करत आहे. तिरंगी मालिकेत आत्तापर्यंत भारतीय संघाने 3 सामने खेळले आहेत. भारतीय संघाने त्यात दोनदा विजय नोंदवला आहे. गुणतालिकेत भारतीय महिला संघ पहिल्या क्रमांकावर आहे. तर साऊथ आफ्रिका संघाने 2 सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी एकही सामना जिंकलेला नाही. ते गुणतालिकेत तळाशी आहेत.
दक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध भारत महिला पाचवा एकदिवसीय सामना 2025 कधी आणि कुठे खेळला जाईल?
भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ तिरंगी मालिका 2025 चा 5वा सामना 7 मे (बुधवार) रोजी कोलंबो येथील आर प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरू होईल.
दक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध भारत महिला 5 वा एकदिवसीय सामना 2025 चे लाईव्ह टेलीकास्ट आणि लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे आणि कसे पहावे?
या सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात उपलब्ध नसेल, परंतु दक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध भारत महिला 5व्या एकदिवसीय 2025 सामन्याचे थेट प्रक्षेपण फॅनकोड मोबाइल अॅप आणि वेबसाइटवर पाहता येईल. हे स्ट्रीमिंग पाहण्यासाठी, फॅनकोडवरील सबस्क्रिप्शन पास आवश्यक असेल.
दक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध भारत महिला खेळाडू:
भारतीय महिला संघ: स्मृती मानधना, प्रितिका रावल, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), स्नेहा राणा, काशवी गौतम, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी
दक्षिण आफ्रिका संघ: लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), ताजमिन ब्रिट्स, लारा गुडॉल, क्लो ट्रायॉन, नदिन डी क्लर्क, सुने लुउस, सिनालो जाफ्ता (यष्टीरक्षक), ॲनेरी डेर्कसेन, अयाबोंगा खाका, मसाबाता क्लास, नॉनकुलुलेको मलाबा