South Africa National Cricket Team vs Pakistan National Cricket Team ODI Head To Head: दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज म्हणजेच 19 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना केपटाऊनमधील (Cape Town) न्यूलँड्स (Newlands) येथे खेळवला जाणार आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा 3 गडी राखून पराभव केला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 9 गडी गमावून 239 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने 49.3 षटकांत 7 गडी गमावून लक्ष्य गाठले. यासह पाहुण्या संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता दुसरी वनडे जिंकून दक्षिण आफ्रिकेची नजर मालिकेत बरोबरी करण्याकडे असेल. तर पाकिस्तानचा संघ दुसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून मालिका जिंकण्याच्या इराद्याने उतरणार आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. (हेही वाचा - Virat Kohli and R Ashwin Emotional Video: निवृत्तीच्या घोषणेनंतर ड्रेसिंग रूममध्ये विराट कोहलीला मिठी मारताना आर अश्विन भावूक (Watch Video))
दोन्ही संघांमधला हेड टू हेड रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान वनडेत 84 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा वरचष्मा दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेने 84 पैकी 52 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. तर झिम्बाब्वेने केवळ 31 सामने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना अनिर्णित राहिला. यावरून दक्षिण आफ्रिकेचा संघ अधिक मजबूत असल्याचे दिसून येते. याशिवाय दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळू शकतो.
दोन्ही संघांचे प्लेइंग 11
दक्षिण आफ्रिका: टोनी डी झोर्झी, रायन रिकेल्टन, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन, अँडीले फेहलुकवायो, केशव महाराज, कागिसो रबाडा, ओटनील बार्टमन.
पाकिस्तान : अब्दुल्ला शफीक, सईम अयुब, बाबर आझम, तय्यब ताहिर, सलमान आगा, मोहम्मद रिझवान (कर्णधार), शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, अबरार अहमद.