Photo Credit- X

South Africa National Cricket Team vs Pakistan National Cricket Team 2nd ODI 2024 Live Streaming:   दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज म्हणजेच 19 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना केपटाऊनमधील (Cape Town) न्यूलँड्स (Newlands) येथे खेळवला जाणार आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा 3 गडी राखून पराभव केला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 9 गडी गमावून 239 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने 49.3 षटकांत 7 गडी गमावून लक्ष्य गाठले. यासह पाहुण्या संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता दुसरी वनडे जिंकून दक्षिण आफ्रिकेची नजर मालिकेत बरोबरी करण्याकडे असेल. तर पाकिस्तानचा संघ दुसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून मालिका जिंकण्याच्या इराद्याने उतरणार आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.  (हेही वाचा  -  Zimbabwe vs Afghanistan 2nd ODI 2024 Live Streaming: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात चुरशीची लढत, भारतात थेट सामन्याचा आनंद कधी, कुठे आणि कसा घ्यायचा घ्या जाणून)

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना मंगळवार 19 डिसेंबर रोजी पार्ल येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5:30 वाजता खेळवला जाईल.

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना कुठे पाहायचा?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान एकदिवसीय मालिका भारतातील टीव्हीवर स्पोर्ट्स 18-1 एसडी आणि स्पोर्ट्स 18-1 एचडी चॅनेलवर थेट प्रसारित केली जाईल. JioCinema ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना इथून दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचा आनंद घेता येईल.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11

दक्षिण आफ्रिका: टोनी डी झोर्झी, रायन रिकेल्टन, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन, अँडीले फेहलुकवायो, केशव महाराज, कागिसो रबाडा, ओटनील बार्टमन.

पाकिस्तान : अब्दुल्ला शफीक, सईम अयुब, बाबर आझम, तय्यब ताहिर, सलमान आगा, मोहम्मद रिझवान (कर्णधार), शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, अबरार अहमद.