PAK vs SA (Photo Credit - X)

Australian Men's Cricket Team vs India National Cricket Team: दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला गुरुवार पासून सुरुवात झाली आहे. उभय संघांमधील हा सामना सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळवला जात आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेने 9 षटकांत 3 गडी गमावून 27 धावा केल्या होत्या. यजमान संघाला विजयासाठी अद्याप 121 धावांची गरज आहे. तर पाकिस्ताला विजयासाठी 7 विकेटची गरज आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी सध्या एडन मार्कराम 25 चेंडूत 22 धावांवर नाबाद आहे आणि कर्णधार टेंबा बावुमा 1 चेंडूत 0 धावांवर नाबाद आहे. दुसऱ्या डावात पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना मोहम्मद अब्बासने 2 बळी घेतले. तर खुर्रम शहजादला 1 विकेट मिळाली.

पाकिस्तानने दुसऱ्या डावात 259 धावा केल्या

तिसऱ्या दिवशी पाकिस्तानने दुसऱ्या डावात 59.4 षटकात 259 धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात सौद शकीलने सर्वाधिक 84 धावा केल्या. सौद शकीलशिवाय बाबर आझमने 50 आणि शान मसूदने 28 धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकेसाठी मार्को जॅनसेनने दुसऱ्या डावात सर्वाधिक 6 बळी घेतले. तर कागिसो रबाडाला 2, कॉर्बिन बॉशला 1 विकेट आणि डॅन पॅटरसनला 1 विकेट मिळाली.

किती वाजता सुरु होणार चौथ्या दिवसाचा खेळ

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ रविवार, 29 डिसेंबर रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळवला जाईल. (हे देखील वाचा: New Zealand Beat Sri Lanka, 1st T20I Match Full Highlights: न्यूझीलंडकडून श्रीलंकेचा 8 धावांनी पराभव; फलंदाजांनंतर गोलंदाजांचा धुमाकूळ; पहा सामन्याचे संपूर्ण हायलाइट्स)

भारतात कुठे पाहणार लाइव्ह सामना?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान कसोटी मालिका भारतातील टीव्हीवर स्पोर्ट्स 18-1 SD आणि स्पोर्ट्स 18-1 HD चॅनेलवर थेट प्रसारित केली जाईल. JioCinema ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना इथून पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाचा आनंद घेता येईल.

दोन्ही संघाची प्लेइंग 11

दक्षिण आफ्रिका: टोनी डी झोर्झी, एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जेन्सन, कॉर्बिन बॉश, कागिसो रबाडा, डेन पॅटरसन.

पाकिस्तान: शान मसूद (कर्णधार), सईम अयुब, बाबर आझम, कामरान गुलाम, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, सलमान आगा, आमेर जमाल, नसीम शाह, खुर्रम शहजाद, मोहम्मद अब्बास