World Test Championship Points Table 2023-25: कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. डर्बनमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात आफ्रिकन संघाने श्रीलंकेच्या संघाचा 233 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही मोठा फायदा झाला आहे. आफ्रिकन संघाने मोठी झेप घेत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. (हे देखील वाचा: South Africa Beat Sri Lanka, 1st Test Match Scorecard: दक्षिण आफ्रिकेकडून लंका'दहन', पहिल्या कसोटीत 233 धावांनी केला पराभव; मार्को जॉन्सन ठरला सामनावीर)
आफ्रिकेने घेतली मोठी झेप
श्रीलंकेविरुद्धच्या डर्बन कसोटीतील विजयापूर्वी आफ्रिकन संघ 54.17 टक्के गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर होता. या विजयासह आफ्रिकन संघाने 59.26 टक्के गुण मिळवले असून ते दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. आफ्रिकेने दुसऱ्या क्रमांकावर पोहोचल्याने ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. कांगारू संघ आता दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलवर ऑस्ट्रेलियाचे 57.69 टक्के गुण आहेत.
Proteas dominate Sri Lanka in Durban! 🇿🇦
They climbs 🔼 to 2nd position pushing Sri Lanka down ⬇️ to 5th in the WTC Points Table.#SAvSL #WTC pic.twitter.com/iziyYAE57S
— OneCricket (@OneCricketApp) November 30, 2024
भारत पहिल्या स्थानावर
डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलवर भारतीय संघ अजूनही पहिल्या स्थानावर आहे. भारत 61.11 टक्के गुणांसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे. आफ्रिका भारताच्या जवळ आली असली तरी. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी सामन्यात विजयाची नोंद करून टीम इंडियाला आपली स्थिती आणखी सुधारायची आहे. दुसरीकडे, आफ्रिकन संघाला आपली विजयी घोडदौड कायम राखून टॉप-2 मध्ये आपले स्थान कायम राखायचे आहे. जर आफ्रिकेला हे करण्यात यश आले तर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जाऊ शकतो.
WTC पॉइंट टेबलवरील सर्व संघांची स्थिती
भारत – 61.11 टक्के गुण
दक्षिण आफ्रिका – 59.26 टक्के गुण
ऑस्ट्रेलिया – 57.69 टक्के गुण
न्यूझीलंड – 54.55 टक्के गुण
श्रीलंका – 50.00 टक्के गुण
इंग्लंड – 40.79 टक्के गुण
पाकिस्तान – 33.33 टक्के गुण
वेस्ट इंडिज - 26.67 टक्के गुण
बांगलादेश - 25.00 टक्के गुण