South Africa National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team, 1st Test Match Scorecard: दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना डर्बनमधील किंग्समीड येथे खेळला गेला. पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिका संघाने श्रीलंकेचा 233 धावांनी पराभव केला आहे. यासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू मार्को जॅनसेनने घातक गोलंदाजी करत दोन्ही डावात 11 बळी घेतले. (हे देखील वाचा: IND vs AUS PM's XI Match Play On Day 1 Called Off: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पंतप्रधान इलेव्हन सराव सामन्याचा पहिला दिवस पावसात गेला वाहून, उद्या खेळवला 50-50 षटकाचा सामना)
South Africa register their second-biggest victory by runs against Sri Lanka in Tests!
Go 1-0 up in the series with a 233-run win in Durban.#SAvSL #DurbanTest pic.twitter.com/WHLzrj0V4M
— Cricbuzz (@cricbuzz) November 30, 2024
येथे वाचा संपूर्ण स्कोरकार्ड
तत्पूर्वी, श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्वाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात 49.4 षटकांत सर्वबाद 191 धावांवर आटोपला. कर्णधार टेंबा बावुमाने 117 चेंडूत 70 धावांची संघर्षपूर्ण खेळी खेळली, ज्यात 9 चौकार आणि 1 षटकार होता. कागिसो रबाडा (15), केशव महाराज (24), मार्को जॅन्सन (13) यांनी खालच्या क्रमवारीत उपयुक्त योगदान दिले. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. असिथा फर्नांडोने 14.4 षटकांत 44 धावांत 3 बळी घेतले, तर लाहिरू कुमाराने 12 षटकांत 70 धावांत 3 बळी घेतले. विश्व फर्नांडो (2/35) आणि प्रभात जयसूर्या (2/24) यांनीही महत्त्वपूर्ण कामगिरी केली.
श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात 42 धावांत गारद
प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात केवळ 42 धावांत गडगडला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने श्रीलंकेची फलंदाजी उद्ध्वस्त केली. मार्को जॅनसेनने 6.5 षटकांत 13 धावांत 7 बळी घेत कहर केला. त्याला जेराल्ड कोएत्झीने साथ दिली, त्याने 3 षटकात 18 धावा देत 2 बळी घेतले. श्रीलंकेची फलंदाजी पूर्णपणे विस्कळीत झाली. एकही फलंदाज टिकून खेळू शकला नाही. कामिंडू मेंडिसने 20 चेंडूत 13 धावा केल्या, तर लाहिरू कुमाराने 5 चेंडूत 10 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. सात फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. श्रीलंकेने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. धावफलकावर पहिली विकेट 6 धावांवर पडली आणि काही वेळातच संपूर्ण संघ 13.5 षटकांत गडगडला.
दक्षिण आफ्रिकेने दुसरा डाव 366 डावावर केला घोषित
यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 366/5 धावा करून डाव घोषित केला. ट्रिस्टन स्टब्स (122 धावा, 221 चेंडू) आणि कर्णधार टेंबा बावुमा (113 धावा, 228 चेंडू) यांनी शानदार शतके झळकावली. एडन मार्करामने 47 आणि डेव्हिड बेडिंगहॅमने 21 नाबाद धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून गोलंदाजीमध्ये प्रभात जयसूर्या आणि विश्वा फर्नांडो यांनी 2-2 बळी घेतले. असिथा फर्नांडोला 1 यश मिळाले. दक्षिण आफ्रिकीने श्रीलंकेसमोर 516 धावांचे मोठे लक्ष्य दिले.
श्रीलंकेचा संपूर्ण संघ 282 धावा करू शकला
दुसऱ्या डावात लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ 79.4 षटकांत केवळ 282 धावा करू शकला नाही. श्रीलंकेकडून दिनेश चंडिमलने सर्वाधिक 83 धावांची खेळी खेळली. दिनेश चंडिमलशिवाय कर्णधार धनंजय डी सिल्वाने 59 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॉन्सनने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. मार्को जॉन्सनशिवाय कागिसो रबाडा, गेराल्ड कोएत्झी आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.