India National Cricket Team vs Australia PM XI, Pink Ball Warm-up Match: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पंतप्रधान इलेव्हन यांच्यातील सराव सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाहून गेला. दोन दिवसीय सामन्याच्या पहिल्या दिवशी एवढा पाऊस पडला की दोन्ही संघ नाणेफेकसाठीही येऊ शकले नाहीत. पहिला दिवस वाहून गेल्यानंतर आता दोन्ही संघांच्या कर्णधारांनी दुसऱ्या दिवशी 50-50 षटके खेळण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांना सरावाची समान संधी मिळावी यासाठी हे केले जात आहे. दुसऱ्या दिवशी 9:10 वाजता सामना सुरू होईल. (हे देखील वाचा: IND vs AUS 2nd Test 2024: ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मिळाली आनंदाची बातमी, स्टार खेळाडू मैदानात परतण्यासाठी सज्ज!)
सराव सामन्यासाठी दोन्ही संघ
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाशदीप, प्रसीद कृष्णा, हर्षित राणा, नितीशकुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
ऑस्ट्रेलिया पंतप्रधान इलेव्हन: जॅक एडवर्ड्स (कर्णधार), चार्ली अँडरसन, महाली बेर्डमन, स्कॉट बोलँड, जॅक क्लेटन, एडन ओ'कॉनर, ऑली डेव्हिस, जेडेन गुडविन, सॅम हार्पर, हॅनो जेकब्स, सॅम कॉन्स्टास, लॉयड पोप, मॅथ्यू रेनशॉ, जेम्स रायन.
Update: PM’s XI v India - Manuka Oval
Play has been abandoned for Day 1 and will resume tomorrow (Sunday) at 9:10 am IST. Coin toss will be at 8:40 am IST.
Teams have agreed to play 50 overs per side.#TeamIndia pic.twitter.com/qb56K8dtX0
— BCCI (@BCCI) November 30, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)