Photo Credit - X

South Africa National Cricket Team vs Indian National Cricket Team, 2nd T20I Live Playing XI Update:  दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील चार सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आजपासून म्हणजेच 10 नोव्हेंबरपासून खेळवला जात आहे. उभय संघांमधला पहिला सामना गकेबरहा (Gqeberha )  येथील सेंट जॉर्ज पार्कवर (St George's Park)  खेळवला जात आहे. पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) 61 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशचा (Bangladesh)  पराभव करून दक्षिण आफ्रिका संघ या मालिकेत प्रवेश करणार आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामच्या (Aiden Markram) खांद्यावर आहे. तर टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव  (Suryakumar Yadav) करत आहे.  (हेही वाचा  - South Africa vs India, 2nd T20I Match Live Score Update: दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 125 धावांचे आव्हान )

पाहा पोस्ट -

दरम्यान, दुसऱ्या T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 15 धावांवर संघाचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून केवळ 124 धावा केल्या. टीम इंडियासाठी स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने सर्वाधिक 39 नाबाद धावांची खेळी खेळली. या झंझावाती खेळीदरम्यान हार्दिक पांड्याने 45 चेंडूत चार चौकार आणि एक षटकार ठोकला. हार्दिक पांड्याशिवाय अक्षर पटेलने 27 धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवातही निराशाजनक झाली आणि अवघ्या 44 धावांवर संघाचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अवघ्या 19 षटकांत सात विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. दक्षिण आफ्रिकेसाठी ट्रिस्टन स्टब्सने 47 नाबाद धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. ट्रिस्टन स्टब्सशिवाय रीझा हेंड्रिक्सने 24 धावा केल्या.

वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टीम इंडियाला पहिले मोठे यश मिळवून दिले. टीम इंडियासाठी स्टार गोलंदाज वरुण चक्रवर्तीने चार षटकांत 17 धावा देत सर्वाधिक पाच बळी घेतले. वरुण चक्रवर्तीशिवाय अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडिया यांच्यातील मालिकेतील तिसरा सामना बुधवारी म्हणजेच 13 नोव्हेंबर रोजी रात्री 8.30 वाजता होणार आहे.