South Africa vs India, 2nd T20I Match Live Score Update: दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 125 धावांचे आव्हान

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 15 धावांवर संघाचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून केवळ 124 धावा केल्या.

South Africa vs India, 2nd T20I Match Live Score Update: दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 125 धावांचे आव्हान
Photo Credit - BCCI X

South Africa National Cricket Team vs Indian National Cricket Team, 2nd T20I Live Toss Update:  दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील चार सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आजपासून म्हणजेच 10 नोव्हेंबरपासून खेळवला जात आहे. उभय संघांमधला पहिला सामना गकेबरहा येथील सेंट जॉर्ज पार्कवर खेळवला जात आहे. पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 61 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशचा पराभव करून दक्षिण आफ्रिका संघ या मालिकेत प्रवेश करणार आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामच्या खांद्यावर आहे. तर टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. दरम्यान, दुसऱ्या T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधाराचा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला.  (हेही वाचा  -   South Africa vs India, 2nd T20I Match Live Score Update: भारताचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला, अक्षर पटेल धावबाद)

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 15 धावांवर संघाचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून केवळ 124 धावा केल्या. टीम इंडियासाठी स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने सर्वाधिक 39 नाबाद धावांची खेळी खेळली. या झंझावाती खेळीदरम्यान हार्दिक पांड्याने 45 चेंडूत चार चौकार आणि एक षटकार ठोकला. हार्दिक पांड्याशिवाय अक्षर पटेलने 27 धावा केल्या.

गेल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या संजू सॅमसनच्या रूपाने मार्को जॉन्सनने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जेन्सेन, नाकाबायोमझी पीटर, एडन मार्कराम, जेराल्ड कोएत्झी आणि अँडीले सिमेलेन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 20 षटकात 125 धावा करायच्या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला हा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधायची आहे.

(The above story first appeared on LatestLY on Nov 10, 2024 09:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).