Ireland National Cricket Team vs South Africa National Cricket Team 2nd ODI Match: आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 4 ऑक्टोबर रोजी अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकाने आयर्लंडचा 174 धावांनी पराभव करत मालिकेवर 2-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने आयर्लंडचा 139 धावांनी पराभव केला होता.
◾ 1st ODI: Won by 139 runs
◾ 2nd ODI: Won by 174 runs
South Africa flex their ODI muscle and win the series in style 💪 https://t.co/9buF8mV9dR | #IREvSA pic.twitter.com/M3ziYNgOBt
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 4, 2024
त्याआधी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो योग्य ठरला. दक्षिण आफ्रिकेकडून ट्रिस्टन स्टब्सने नाबाद 81 चेंडूत 112 धावा केल्या. त्यात 3 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. तर त्यालाच साथ देत व्हेरीनने 67 धावांची सावध खेळी केली आणि आयर्लंडसमोर 4 विकेट गमावून 343 धावांचे लक्ष्य ठेवले.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या आयर्लंडची सुरुवात काही खास झाली नाही. अँड्र्यू बालबिर्नी 1 आणि कर्णधार पॉल स्टर्लिंग 5 धावा करुन लवकरच माघारी परतले. आणि त्यानंतर आयर्लंडच्या फलंदाजानी लागोपाठ विकेट फेकल्या. आयर्लंडचा संघ 30.3 षटकात 169 धावांवर दहा विकेट गमावून गारद झाला. आयर्लंडकडून क्रेग यंग याने 29 धावांची सर्वाधिक खेळी खेळली, तर दक्षिण आफ्रिकेकडून लिझाद विल्यम्सने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.