‘टी-20 क्रिकेट लीग आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी धोका’, दक्षिण आफ्रिका आणि CSK च्या तडाखेबाज फलंदाजाचे मोठे विधान
फाफ डु प्लेसिस (Photo Credit: Twitter/IPL)

“टी-20 लीग आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी गंभीर धोका आहे” असे मत माजी दक्षिण आफ्रिका (South Africa) व चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super League) फलंदाज फाफ डू प्लेसिसने (Faf du Plessis) मांडले आहे. डु प्लेसिसने म्हटले की क्रिकेट बोर्डांनी लीग आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट यांच्यात चांगला समतोल शोधला पाहिजे. पाकिस्तान सुपर लीगचे (Pakistan Super League) उर्वरित सामने खेळण्यासाठी अबू धाबी येथे पोहचलेल्या डु प्लेसिसने व्हर्च्युअल मीडिया संवादात म्हटले की, “टी -20 लीग आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी धोकादायक आहे. लीगची शक्ती दरवर्षी वाढत असते आणि सुरुवातीला जगभरात फक्त 2 लीग्स होत्या आणि आता एका वर्षामध्ये 4,5, 6,7 लीग होत आहेत. लीग्स अजून मजबूत होत आहेत.” डु प्लेसिस पीएसएलमध्ये (PSL) पेशावर झल्मी  (Peshawar Zalmi) संघाकडून खेळेल. 9 जून रोजी पीएसएलचे उर्वरित सामने खेळले जाणार आहेत. (PSL 2021 साठी UAE कडून पाकिस्तान बोर्डाला मिळाला ग्रीन सिग्नल, अबू धाबी येथे होणार उर्वरित सामन्यांचे आयोजन)

डु प्लेसिस म्हणाला की, “जर खेळाचे रक्षण करणाऱ्यांनी आता सुधारात्मक पाऊले उचली नाहीत तर भविष्यामध्ये फुटबॉल प्रमाणेच घरगुती लीगमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गमावण्याचा धोका आहे. ते एक मोठे आव्हान आहे. 10 वर्षात क्रिकेट कदाचित फुटबॉल सारखे असेल जिथे आपल्याकडे जागतिक स्पर्धा असतील आणि या दरम्यान जगभरात जेथे लीग खेळू शकतात अशा लीग्स आपल्यात असतील,” ESPNcricinfo ने सामायिक केलेल्या व्हिडिओमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज म्हणाला. क्रिस गेल, ड्वेन ब्रावो यासारख्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचे उदाहरण देऊन ड्यू प्लेसिस म्हणाला की सध्याचे बरेच खेळाडू स्वतंत्रपणे क्रिकेटपटू बनण्याची निवड करू शकतात जे त्यांच्या संबंधित राष्ट्रीय संघांसाठी मोठे नुकसान आहे.

“वेस्ट इंडीज हा बहुधा पहिला संघ आहे ज्याने हे करणे सुरू केले. त्यांचे सर्व खेळाडूआंतरराष्ट्रीय संघापासून दूर टी-20 डोमेस्टिक सर्किटवर गेले. त्यामुळे वेस्ट इंडीयन संघाने त्यांचे बरेच महत्त्वाचे खेळाडू गमावले. हे दक्षिण आफ्रिकेतही होऊ लागले आहे,” त्याने पुढे म्हटले. जवळजवळ प्रत्येक देशात टी-20 लीगचे आयोजन केले जात आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे आयोजन दिवसेंदिवस कठीण होत आहे. COVID ने निर्माण केलेल्या अभूतपूर्व काळामुळे, टी-20 लीगची विविध देशांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटशी टक्कर होते किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेळापत्रक निश्चित केले जाते जेणेकरून क्रिकेटर्स देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय दोन्ही क्रिकेटमध्ये भाग घेऊ शकतील.