Cricketers and Coach Controversies: या भारतीय 3 महान क्रिकेटपटू-प्रशिक्षकाच्या जोडीतील वाद बनले आकर्षणाचे केंद्र, आजची आहे खेळ चाहत्यांच्या आठवणीत
अनिल कुंबळे आणि विराट कोहली (Photo Credit: Getty Images)

Cricketers and Coach Controversies: क्रीडा जगात क्रिकेटला (Cricket) एक विशेष स्थान आहे. क्रिकेट खेळाला ‘जेंटलमॅन गेम’ म्हणतात. क्रीडा विश्वात या खेळाला सुसंस्कृत लोकांचा खेळ म्हटले जाते पण वादविवादांना क्रिकेटही अपवाद ठरलेला नाही. गेल्या अनेक वर्षात क्रिकेटच्या मैदानात किंवा मैदानाबाहेर खेळाडूंमध्ये, क्रिकेट मंडळ, प्रशिक्षक-खेळाडूंमध्ये अनेक गोष्टींबाबत वादविवाद झालेले पाहायला मिळाले आहे. यापैकी बरेच क्रिकेटच्या इतिहासात काळ्या अक्षराने लिहिले आहे जे कदाचित क्रिकेटप्रेमी विसरु शकणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात वेगवेगळ्या प्रकारचे विवाद नोंदवले गेले आहेत ज्यात मॅच फिक्सिंग किंवा खेळाडूंकडून गैरवर्तन यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे एका संघातील महान प्रशिक्षक व खेळाडूंमध्ये देखील अनेकदा वाद झालेले आहे. (‘Sourav Ganguly याला कर्णधार म्हणून परिश्रम नाही तर फक्त नियंत्रण मिळवायचे होते,’ माजी प्रशिक्षक Greg Chappell यांचा मोठा आरोप)

ग्रेग चॅपल-सौरव गांगुली (Greg Chappell-Sourav Ganguly)

चॅपल-गांगुली यांच्यातील वाद भारतीय क्रिकेट इतिहासातील वाईट मानले क्षणांपैकी जाते. 2005 च्या अखेरीस चॅपेल यांनी भारताच्या प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली, परंतु जबाबदारी स्वीकारल्यानंतर लगेचच ते त्यांनी वादाच्या भोवऱ्यात राहायला सुरुवात केली. चॅपेलच्या कार्यकाळात संघात दोन गट दिसू लागले आणि त्यानंतर कर्णधार सौरव गांगुलीची वादामुळे चॅपेल यांनी कर्णधारपदावरून हकालपट्टी केली. गांगुलीचे चॅपलशी खूप वाईट संबंध होते. त्यानंतर चॅपलने बर्‍याच विवादांना जन्म दिला आणि अखेरीस 2007 च्या वर्ल्ड कप मधील पराभवानंतर, चॅपेलचा कार्यकाळ वादाच्या दरम्यान संपुष्टात आला.

अनिल कुंबळे-विराट कोहली (Anil Kumble-Virat Kohli)

भारतीय संघाचे जंबो म्हणजेच अनिल कुंबळे यांना 2016 मध्ये भारतीय संघाचा प्रशिक्षक बनवण्यात आले होते. कुंबळेच्या प्रशिक्षणात टीमम इंडियाने चांगली कामगिरी केली पण कर्णधार विराट कोहली सोबत कुंबळेच कधीही जमलं नाही. म्हणूनच कुंबळेने आपल्या पदाचा त्याग करत 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर राजीनामा दिला.

रमेश पोवार-मिताली राज (Ramesh Powar-Mithali Raj)

2018 इंग्लंड विरोधात टी-20 वर्ल्ड कप सेमीफायनल सामन्यासाठी मिताली राजला प्लेइंग इलेव्हनमधून वाळण्यात आले होते. त्यावेळी राज शानदार फॉर्ममध्ये होती. यानंतर मितालीने तत्कालीन सीआयओ राहुल जोहरी आणि सबा करीम यांना एका ई-मेलद्वारे पोवार यांनी तिचा अपमान केल्याचा आरोप केला. यानंतर अनेक विवादांनंतर पोवार यांना पदावरून काढून टाकण्यात आले.