Sarfaraz Khan (Photo Credit - X)

Social Media Reaction On Sarfaraz Khan Century:  बंगळुरू कसोटीच्या चौथ्या दिवशी सरफराज खानने शानदार शतक ( Sarfaraz Khan Century) झळकावले. सरफराज खानने 195 चेंडूत 150 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 18 चौकार आणि 3 षटकार मारले. या शानदार शतकानंतर सरफराज खानला टीम साऊदीने आपला शिकार बनवले. सरफराज खान खानचे कसोटी फॉरमॅटमधील हे पहिले शतक आहे. याशिवाय त्याने तीनदा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे. सरफराज खान त्याच्या शतकानंतर सतत चर्चेत असतो. या शतकानंतर सरफराज खान भारताचा मोठा सुपरस्टार बनणार असल्याचे क्रिकेट तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (हेही वाचा  -  Sarfaraz Khan Milestone: आधी डक, नंतर शतक...बंगळुरू कसोटीत सरफराज खानचा कहर, 'या' खास क्लबमध्ये मिळवला प्रवेश )

सरफराज खान त्याच्या शतकानंतर सोशल मीडियावर सतत ट्रेंड करत आहे. सोशल मीडिया यूजर्स सरफराज खानचे कौतुक करत आहेत. त्याचवेळी, सरफराज खानच्या शतकी खेळीनंतर बंगळुरू कसोटी रोमांचक वळणावर पोहोचली आहे. वृत्त लिहेपर्यंत भारताची धावसंख्या 6 विकेटवर 441 धावा आहे. सध्या भारताकडून रवी अश्विन आणि रवींद्र जडेजा क्रीजवर आहेत. भारतीय संघाची आघाडी 85 धावांवर पोहोचली आहे.

पाहा व्हिडिओ -

पहिल्या डावात भारतीय संघ फक्त 46 धावांवरच मर्यादित होता. याला प्रत्युत्तरात न्यूझीलंडने पहिल्या डावात 402 धावा केल्या. अशा प्रकारे न्यूझीलंडला 356 धावांची मोठी आघाडी मिळाली. मात्र, त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी शानदार पलटवार केला. भारतीय कर्णधार रोहित शर्माने 52 धावा केल्या. विराट कोहलीने 70 धावांची शानदार खेळी केली. तर सर्फराज खान 150 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, ऋषभ पंतचे शतक अवघ्या 1 धावाने हुकले. ऋषभ पंत 99 धावा करून विल्यम ओरुकेचा बळी ठरला.