
Sri Lanka Women's National Cricket Team vs India Women's National Cricket Team Match: भारत आणि श्रीलंकेच्या (IND W vs SL W) महिला संघांमधील तिरंगी मालिकेचा अंतिम सामना आज म्हणजेच रविवार, 11 मे रोजी कोलंबो येथे खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने (Team India) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने दमदार सुरुवात केली आणि स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) डाव पुढे नेला. श्रीलंकेविरुद्ध मानधनाने शानदार खेळी केली आणि शतक झळकावले. यासह, मानधना अशी कामगिरी करणारी जगातील तिसरी फलंदाज बनली आहे. तिने कोणता विक्रम आपल्या नावावर केला आहे ते जाणून घेवूया.
स्मृती मानधनाने ठोकले शतक
श्रीलंकेविरुद्धच्या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात स्मृती मानधनाने शानदार खेळी केली आणि जलद शतक झळकावले. तिने 101 चेंडूत 2 षटकार आणि 15 चौकारांसह 116 धावांची खेळी केली. या काळात त्याचा स्ट्राईक रेट 114 पेक्षा जास्त राहिला आहे. तिने प्रतिका रावलसोबत पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. त्यानंतर, हरलीन देओलसोबत तिने दुसऱ्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी केली.
Amongst the greats is Smriti Mandhana 💯 #SLvIND pic.twitter.com/5qX7esXfzv
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 11, 2025
अशी कामगिरी करताना पोहचली तिसऱ्या स्थानावर
या शतकासह, स्मृती मानधना महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. तिच्यापेक्षा फक्त ऑस्ट्रेलियाची मेग लॅनिंग (15 शतके) आणि न्यूझीलंडची सुझी बेट्स (13 शतके) पुढे आहेत. तसेच, श्रीलंकेविरुद्ध मानधनाचे हे पहिले शतक आहे आणि तिने या संघाविरुद्ध 600 धावांचा टप्पाही ओलांडला आहे.
महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकवणारे भारतीय खेळाडू (Most 100 in WODIs by Indian)
स्मृती मानधना - 11 शतके
मिताली राज – 7 शतके
हरमनप्रीत कौर – 6 शतके
महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके (Most 100 in WODIs)
15 – एम लॅनिंग (102 डाव)
13 – एस बेट्स (164 डाव)
11* – स्मृती मानधना (102 डाव)