आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) च्या सुपर 4 टप्प्यातील लढाई आता चुरशीची होणार आहे. कारण सुपर 4 साठी चारही संघ मिळाले आहे. शुक्रवारी पाकिस्ताने हाँगकाँगचा (PAK vs HK) दारुन पराभव करत सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे. सुपर 4 साठी आजचा पहिला सामना ब गटातील अव्वल दोन संघ - श्रीलंका आणि अफगाणिस्तान (SL vs AFG) यांच्यात खेळला जाईल. ग्रुप स्टेजमध्ये मोहम्मद नबीच्या अफगाणिस्तान संघाने याआधीच श्रीलंकेला पराभूत केले आहे, त्यामुळे हा सामना दासुन शनाका संघासाठी खूप कठीण जाणार आहे. श्रीलंकेशिवाय अफगाणिस्तानचा संघ बांगलादेशविरुद्ध सलग दोन सामने जिंकून सुपर 4 मध्ये पोहोचला आहे, तर श्रीलंकेने बांगलादेशविरुद्ध करा किंवा मरोचा सामना जिंकून सुपर 4 मध्ये स्थान मिळवले आहे. (हे देखील वाचा: PAK vs HK, Asia Cup 2022: हाँगकाँगचा संघ 38 धावांवर गारद; पाकिस्तान सुपर-4 मध्ये पोहोचला, IND vs PAK पुन्हा भिडणार)
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान आशिया कप 2022 सामना कधी आणि कुठे पाहू शकता?
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान आशिया कप 2022 सामना शनिवार, 3 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे. तसेच हा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान आशिया कप 2022 सामना कधी सुरू होईल?
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान आशिया कप 2022 सामना हा भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होणार आहे.
कोणते टीव्ही चॅनेल श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान आशिया चषक 2022 सामना प्रसारित करतील?
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान आशिया कप 2022 सामना स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट एचडी चॅनेलवर प्रसारित केला जाईल.
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान आशिया चषक 2022 सामन्याचे Live Streaming कसे पहावे?
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान आशिया चषक 2022 सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवर उपलब्ध असेल.