New Zealand दौऱ्यावर गेलेल्या Pakistan संघाचे 6 सदस्य कोरोना पॉसिटीव्ह, आयसोलेशन दरम्यान होणाऱ्या सराव सत्रावरही लागले निर्बंध
पाकिस्तान क्रिकेट टीम (Photo Credit: Getty)

न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघातील (Pakistan Cricket Team) सहा सदस्यांना कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाल्याची माहिती न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं (New Zealand Cricket Board) जाहीर केली. न्यूझीलंड क्रिकेटला याबाबत बातमी देण्यात आली आहे. सध्या टीममधील काही सदस्यांनी "व्यवस्थापित क्वारंटाइनच्या पहिल्या दिवशी प्रोटोकॉलचे उल्लंघन केले होते." दरम्यान या सर्वांना सध्या Christchurch मधील एका सुविधागृहात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहेत. आयसोलेशन दरम्यान खेळाडूंना सराव करण्याची परवानगी देण्यात अली होती मात्र आता त्याच्यावरही निर्बंध लावण्यात आले आहेत. करोनाबाधित सहा खेळाडूंची नावं अद्याप समोर आलेली नाहीत. याआधी न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी पाकिस्तान फलंदाज फखर जमानमध्ये (Fakhar Zaman) करोनाची लक्षणं आढळली होती. ज्यामुळे त्याला न्यूझीलंड दौऱ्यामधून वगळण्यात आलं होतं. पाकिस्तान संघ टी -20 आणि कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडच्या दौर्‍यावर गेला आहे.

न्यूझीलंड क्रिकेटने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की, "या सहा निकालांपैकी दोन निकालाला 'ऐतिहासिक' मानले गेले; तर चार नवीन असल्याचे निश्चित झाले. याचा अर्थ असा की न्यूझीलंडमध्ये पथकाच्या प्रवेशास कारणीभूत असलेल्या प्रोटोकॉलच्या अनुषंगाने, पथकाच्या सहा सदस्यांना व्यवस्थापित केलेल्या क्वारंटाइन सुविधेच्या ठिकाणी हलविले जाईल." लाहोर सोडण्यापूर्वी देखील पाकिस्तान संघाच्या सर्व सदस्यांची चार वेळा कोरोना टेस्ट करण्यात आली होती. 10 डिसेंबरपासून पाकिस्तानविरुद्ध न्यूझीलंड संघ तीन टी-20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. त्याआधी न्यूझीलंड वेस्ट इंडिजविरुद्ध शुक्रवारपासून तीन टी-20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे.

टीममधील मोठ्या संख्येने सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले असल्यानेपाकिस्तान संघासाठी हे खूप निराशाजनक आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डालाही याची जाणीव करून देण्यात आली आहे की व्यवस्थापित केलेल्या क्वारंटाइनच्या पहिल्या दिवशी पाकिस्तान संघातील काही सदस्यांनी प्रोटोकॉलचे उल्लंघन केले. अशा परिस्थितीत कीवी क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे की आम्ही भेट देणार्‍या संघाशी चर्चा करुन त्यांच्या गरजा समजून घेण्यास मदत करू. NZC आंतरराष्ट्रीय संघांच्या होस्टिंगमध्ये सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेला मानते आणि आरोग्य व सरकारी स्थितीस समर्थन देते.