
भारताचा माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू राहुल द्रविड (Rahul Dravid) भारतीय संघाचा प्रशिक्षक झाल्यापासून टीम इंडिया (Team India) बदलाच्या काळातून जात आहे. टीम इंडियाचा प्रत्येत मालिकेत कर्णधार पासुन ते सलामी जोडी पर्यत बदल दिसत असतो. भारतीय संघानेही गेल्या वर्षभरात 9 सलामी जोडीवर प्रयोग केले आहे. आता T20 विश्वचषकाला काही महिनेच उरले आहेत. अशा परिस्थितीत प्रशिक्षक राहुल द्रविडला इतके बदल करून काय करायचे आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या (WI) पहिल्या T20 सामन्यात, जिथे सर्वांना अपेक्षा होती की ऋषभ पंत किंवा इशान किशन कर्णधार रोहित शर्मासह सलामी करतील, परंतु सूर्यकुमार यादव रोहित शर्मासोबत सलामीला आला. या निर्णयाचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. इशान किशनचाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आलेला नाही.
ऋषभ पंत इंग्लंडमध्ये होता सलामीवीर
इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी ऋषभ पंत कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला आला, पण वेस्ट इंडिजविरुद्ध त्याला चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आले. दरम्यान, सूर्यकुमारने मधल्या फळीत आपले स्थान पक्के केले होते आणि टी-20 फॉरमॅटमध्ये इंग्लंड दौऱ्यावर शतक झळकावले होते. (हे देखील वाचा: IND vs WI 1st T20: वेस्ट इंडिजविरुद्धच्या विजयावर कर्णधार रोहित शर्मा खूश नाही, खेळाडूंना दिल्ला मोठा सल्ला)
गेल्या 12 महिन्यांतील टी-20 मध्ये भारताची सलामीची जोडी:-
1. केएल राहुल आणि रोहित शर्मा
2. केएल राहुल आणि ईशान किशन
3. रोहित शर्मा आणि ईशान किशन
4. ऋतुराज गायकवाड आणि ईशान किशन
5. संजू सॅमसन आणि रोहित शर्मा
6. दीपक हुडा आणि ईशान किशन
7. ईशान किशन आणि संजू सॅमसन
8. रोहित शर्मा आणि ऋषभ पंत
9. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव
राहुलच्या पुनरागमनाने अडचणी वाढतील
भारताचा सलामीवीर केएल राहुल जेव्हा टीम इंडियात परतेल, तेव्हा सूर्यकुमार यादवला मधल्या फळीत जावे लागेल. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात सूर्यकुमार यादवने रोहितसोबत पहिल्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार यादवला मोठी खेळी खेळता आली नाही, त्याने केवळ 24 धावांचे योगदान दिले.