मोहम्मद कैफच्या 2003 वर्ल्ड कप ट्विटवर शोएब अख्तरने दिली मजेदार प्रतिक्रिया, हटके अंदाजात दिले सामना खेळण्याचे चॅलेंज
मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तर (Photo Credit: Getty)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) देशात 21 दिवस लॉकडाउन सुरू आहे. अशा परिस्थितीत स्टार स्पोर्ट्स क्रिकेटप्रेमींना एक संस्मरणीय भेट देत आहे, ते भारत (India) आणि पाकिस्तानमध्ये (Pakistan) आजवर झेलेले विश्वचषकातील सामने प्रसारित करीत आहेत. या भागात त्यांनी भारत-पाकिस्तानमधील 2003 च्या विश्वचषक सामना मंगळवारी प्रक्षेपित केला. त्या सामन्यात खेळल्या भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने (Mohammad Kaif) ट्विटच्या माध्यमातून सामन्याबद्दल आपल्या मुलाच्या विचाराबद्दल माहिती दिली. त्यावर पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) एक मजेदार उत्तर दिले. कैफचा मुलगा कबीरने शोएबच्या चेंडूला खूप सोपे म्हटले. कबीर म्हणाला की शोएबचा चेंडू खूप वेगवान होता, त्यामुळे फलंदाजाला शॉट मारणे खूप सोपे होते. कैफने 2003 च्या विश्वचषक सामन्याचा व्हिडिओ पोस्ट केला आणि लिहिले, "स्टार स्पोर्ट्स इंडियाचे आभार. मुलगा कबीरला तो ऐतिहासिक भारत-पाकिस्तान सामना पाहण्याची संधी मिळाली. पण ज्युनियर त्याच्या वडिलांकडून फारसा प्रभावित झालेला नाही. त्याला वाटते शोएब अख्तरचा चेंडू वेगवान असल्याने त्यावर शॉट मारणे सोपे होते." (लॉकडाउन दरम्यान भारतीय चाहत्यांसाठी Star Sports वर दाखवला जाणार टीम इंडियाच्या 2007 टी-20 वर्ल्ड कप विजयापर्यंतचा प्रवास)

कैफने या ट्विटमध्ये शोएब अख्तरलाही टॅग केले. आणि आता कैफच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत अख्तरने पुन्हा एकदा सामना खेळण्याचे चॅलेंज दिले, पण हटके स्टाईलमध्ये. अख्तरने लिहिले की, 'मोहम्मद कैफ, मग कबीर आणि मिकाईल अली अख्तरचा सामना होऊन जाऊ द्या. त्याला गती संबंधित त्याचे उत्तर मिळेल. त्याला माझे प्रेम द्या."

तो ऐतिहासिक सामना भारताने 6 विकेट्सने जिंकला. वीरेंद्र सहवाग आणि सौरव गांगुली लवकर बाद झाल्यानंतर सचिन तेंडुलकर आणि कैफने तिसर्‍या विकेटसाठी 102 धावांची भागीदारी केली. कैफ 35 धावांवर बाद झाला तर सचिनने शतक दोन धावांनी हुकले. शोएब अख्तरने तेंडुलकरला बाद केले होते. त्यानंतर युवराज सिंहने नाबाद 50 आणि राहुल द्रविडने नाबाद 44 धावांचा डाव खेळला आणि भारताला विजय मिळवून दिला.