कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांमध्ये सतत होणाऱ्या वाढनंतर ऑस्ट्रेलियामध्ये यंदा होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) आयोजनावर संभ्रम कायम आहे. मात्र आयोजकांनी ठरल्यानुसार स्पर्धा आयोजित केली जाईल असे स्पष्ट केले आहे. वेस्ट इंडिज टीम टी-20 वर्ल्ड कपमधील सर्वात संघ आहे. कोरोनामुळे सर्व क्रिकेटसह क्रीडा स्पर्धा झाल्याने भारताच्या क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी बीसीसीआय, भारत सरकार आणि स्टार स्पोर्ट्स वेगवेगळे सामने प्रसारित करत आहे. भारत (India)-पाकिस्तान (Pakistan) टीममध्ये आजवर 50 ओव्हरच्या वर्ल्ड कपमध्ये खेळल्या सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सवर आता भारताच्या पहिल्या टी-20 वर्ल्ड कपचा प्रवास प्रसारित केला जाईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या स्टार स्पोर्ट्स 1 आणि 2 चॅनेलवर 2007 टी-20 विश्वचषकमधील टीम इंडियाचे सर्व सामन्यांचे हायलाईट्स दाखवले जाणार आहे. (BCCI आणि सरकारने क्रिकेटप्रेमींसाठी केली मोठी घोषणा, लॉकडाउनमध्ये डीडी स्पोर्ट्सवर पाहायला मिळणार 'हे' रोमांचक सामने, जाणून घ्या पूर्ण शेड्युल)
2007 मध्ये आयसीसीद्वारे पहिल्या टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वातील टीम इंडियाने प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करून विजय मिळवला होता. 12 ते 17 एप्रिल दरम्यान भारताच्या या विश्वचषकच्या सर्व टी-20 सामन्यांचे पुनःप्रक्षेपण केले जाईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर हे सामने पाहायला मिळतील. भारताचा पहिला सामना स्कॉटलंडशी होणार होता, पण पावसामुळे सामना रद्द करण्यात आला, दुसरा सामना पाकिस्तानशी झाला होता. जो टाय झाला होता आणि बॉल-आऊटने भारत विजयी झाला होता.
कोणता सामना कधी प्रसारित होईल ते जाणून घ्या:
12, एप्रिल - भारत विरुद्ध पाकिस्तान
13, एप्रिल - भारत विरुद्ध न्यूझीलंड
14, एप्रिल - भारत विरुद्ध इंग्लंड 15, एप्रिल - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
16, एप्रिल - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
17, एप्रिल - भारत विरुद्ध पाकिस्तान