(Photo Credit: Shikhar Dhawan/Twitter)

टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेचा तिसऱ्या आणि अंतिम टी-20 मॅचमध्ये सामना करण्यास तयारी करत आहे. दोन्ही संघातील तिसरा टी-20 सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. या निर्णायक मॅचआधी टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) याने आपल्या मुलगा, ज़ोरावर (Zoravar) याचा एक अंत्यंत सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. पहिला सामना पावसाने रद्द झाल्यावर दुसऱ्या मॅचमध्ये टीम इंडियाने वर्चस्व राखत 7 विकेट्सने आफ्रिकेचा धुव्वा उडवला. या सामन्यात विराट कोहली याने विजयी खेळी केली, तर सलामीवीर धवनने त्याला चांगली साथ दिली. धवनने 40 धावा केल्या आणि विराटच्या साथीने संघाला विजयाच्या जवळ नेले. पण, एक मोठा शॉट मारण्याच्या नादात डेविड मिलर (David Miller) याच्याकडून झेल बाद झाला. मिलरने पकडलेला कॅच पाहून चाहते आणि स्वतः विराटदेखील थक्क झाला. (BCCI ने रवि शास्त्री आणि राहुल द्रविड चा फोटो केला शेअर, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकाला ‘Great’ म्हणत नेटिझन्सने केले ट्रोल)

शिखरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याचा मुलगा ज़ोरावर इंग्लिश डब्लूडब्लूई (WWE) च्या कॉमेंट्रीवर भारतीय कुश्ती करताना दिसतोय. झोरावर अत्यंत खोडकर आहे आणि त्याचे अनेक किस्से देखील प्रसिद्ध आहे. शिखर आणि त्याची पत्नी आयेशा यांनी शेअर केलेले व्हिडिओज याचा पुरावा देतात. व्हिडिओ शेअर करताना शिखरने कॅप्शन दिले की, "झोरावर काय शिजवतोय याचा वास येत असेल तर ... हाहााहा". या व्हिडिओतिल कॉमेंट्री प्रसिद्ध डब्लूडब्लूई स्टार स्टीव्हन अँडरसन ज्याला स्टोन कोल्ड या नावाने ओळखले जाते त्याच्या अंडरटेकर याच्या विरुद्धच्या मॅचदरम्यानची आहे. पहा हा मजेदार व्हिडिओ:

दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तिसऱ्या मॅचमध्ये 4 धावा करत धवनला एका मोठ्या एलिट यादीत सहभागी होण्याची संधी आहे. धवनला टी-20 मध्ये 7,000 धावा पूर्ण करण्यासाठी ४ धावांची गरज आहे. असे करताच धवन विराट कोहली, रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांच्यानंतर टी-२० मध्ये सात हजार धावांचा टप्पा ओलांडणार चौथा फलंदाज होईल.