शिखर धवन याने त्याच्या प्रसिद्ध 'कबड्डी स्टाईल' सेलिब्रेशनचे उलगडले रहस्य (Watch Video)
शिखर धवन ( Photo Credits: Getty Images / Twitter)

भारतीय संघाचा सलामी फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) मैदानात उत्सव साजरा करण्याच्या त्याच्या वेगळ्या अंदाजासाठी ओळखला जातो. कबड्डी स्टाईलमध्ये (Kabaddi Styel) तो विकेट साजरी करतो, जे चाहत्यांना खूप आवडते. क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंचा उत्सव साजरा करण्याचा अंदाज त्यांची ओळख बनते आणि टीम इंडियाच्या 'गब्बर' ची ट्रेडमार्क शैली असल्याचा चाहत्यांचा विश्वास आहे. क्रिस्टियानो रोनाल्डोच्या आयकॉनिक ‘Sii’ सेलिब्रेशनपासून सचिन तेंडुलकरपर्यंत अवकाशात बघण्यापर्यंत क्रीडा जगातील बरेच लोक त्यांच्या लोकप्रिय उत्सवांसाठी प्रसिद्ध आहेत. अशा नावांमध्ये भारतीय सलामीचा फलंदाज शिखर आहे ज्यांचा 'कबड्डी स्टाईल' सेलिब्रेशन चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय झाला आहे. आपल्या भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि जेमीमाह रॉड्रिग्स यांच्या डबल ट्रबल युट्यूब कार्यक्रमात धवनने त्याच्या लोकप्रिय उत्सवामागील रहस्य उलगडले. (Coronavirus: स्थलांतरित मजुरांच्या मदतीस आलेल्या सोनू सूद याला 'गब्बर' शिखर धवन ने केला सलाम, केले खास Tweet)

आपल्या ‘थाय-फाइव्ह’ सेलिब्रेशनमागील कारणाबद्दल विचारले असता धवन म्हणाला की कबड्डी सामन्यांमध्ये त्याने हा उत्सव प्रथम पाहिलेला आणि पॉईंट मिळवल्यानंतर रेडर्स कसे साजरे करतात हे त्याला आवडले. धवनने स्वत: कबूल केले की तो कबड्डीचा मोठा चाहता आहे आणि ऑस्ट्रेलियात त्याने कबड्डी स्टाईलमध्ये सेलिब्रेशन करण्यास सुरवात केली. धवन म्हणाला, “जेव्हा जेव्हा मी कबड्डी पाहतो तेव्हा मला थाय-फाइव्ह उत्सव करून रेडर्स पॉईंट साजरा करताना आवडत असत.” धवनचं ठाय-फाइव्ह सेलिब्रेशन क्रिकेट विश्वात अनेक लोकप्रिय उत्सवांपैकी एक आहे.

डबल ट्रॉबल शो वर शिखर धवन

दरम्यान, धवनने दुखापतीमुळे होणाऱ्या समस्यांविषयी आणि दुखापतीमुळे वर्ल्डकपसारख्या स्पर्धेतून बाहेर जाणे क्रिकेटपटूसाठी किती मोठा धक्का बसला याबद्दलही सांगितले. आयसीसी 2019 वर्ल्ड कप दरम्यान धवन चांगल्या फॉर्ममध्ये होता, ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने एक शतकही ठोकले होते, पण थंब फ्रॅक्चरमुळे त्याला स्पर्धेतून घ्यावी लागली होती. “जेव्हा मी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुखापतग्रस्त झालो आणि वर्ल्ड कपमधून बाहेर पडलो तेव्हा. यामुळे मला फार त्रास झाला नाही. मी ते स्वीकारले,” धवन म्हणाला. “मी माझ्या भावनिक आरोग्यावर बरेच काम करतो आणि माझी प्रक्रिया मजबूत आहे. मी दुखापतींपासून नेहमीच बारा झालो आहे आणि माझे पुनर्वसन किंवा प्रशिक्षण घेत असताना मी नेहमी परत येताना आणि चांगले करताना पहातो."