आज इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 17 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. जर राजस्थान रॉयल्सने हा सामना जिंकला तर ते पॉइंट टेबलमध्ये पहिले स्थान मिळवेल. त्याचबरोबर धोनीच्या संघालाही विजय मिळवून गुणतालिकेत पहिल्या दोनमध्ये पोहोचण्याची चांगली संधी आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या राजस्थान रॉयल्सच्या संघाला आणखी एक मोठा धक्का बसला. देवदत्त पडिक्कल 38 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. राजस्थान रॉयल्स संघाचा स्कोअर 88/2.
Match 17. WICKET! 8.3: Devdutt Padikkal 38(26) ct Devon Conway b Ravindra Jadeja, Rajasthan Royals 88/2 https://t.co/MCaswAS0nK #TATAIPL #CSKvRR #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2023