
Ullu या ओटीटी प्लॅटफॉर्म कडून ‘House Arrest’ हा वादग्रस्त शो काढून टाकण्यात आला आहे. सध्या या शो मधील काही आक्षेपार्ह दाखवण्यात आलेल्या गोष्टींवरून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची दखल घेत आता Ullu चे CEO, Vibhu Agarwal, अभिनेता Ajaz Khan यांना नोटीस बजावण्यात आली आहे. एजाज खान हा या ‘House Arrest’ शोचा होस्ट आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, विभू अग्रवाल आणि एजाज खान दोघांनाही 9 मे रोजी राष्ट्रीय महिला आयोगासमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
Ullu app च्या शो वरून नेमका वाद काय?
29 एप्रिल रोजीच्या 'हाऊस अरेस्ट'मधील व्हायरल क्लिपमध्ये, एजाज खान महिला सहभागींना कॅमेर्यावर intimate acts करायला दबाव टकत होता. या महिला त्यासाठी वारंवार नकार देत असताना आणि स्पष्टपणे डिसकम्फर्ट असताना तसे करण्यास भाग पाडले होते. पीटीआयच्या वृत्तानुसार, महिलांना सेटवर कपडे उतरवण्यास सांगण्यात आले, ज्यामुळे संमती आणि सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना "अशा प्रकारची कन्टेन्ट महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवते आणि मनोरंजनाच्या नावाखाली जबरदस्तीला प्रोत्साहन देते. हे सहन केले जाणार नाही," असे त्यांनी म्हटलं आहे. Obscene Content On Social Media, OTT: अश्लील कंटेंट प्रसारण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बजावली केंद्र सरकार, ओटीटी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस.
दरम्यान या प्रकरणावर भाजपाच्या आमदार चित्रा वाघ, ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने इशारा देत आरोप खरे आढळले तर शोचे निर्माते आणि होस्ट यांना Bhartiya Nyaya Sanhita, 2023, आणि अंतर्गत कारवाईला सामोरे जावे लागेल.