श्रीलंका (Sri Lanka) संघाकडून खेळणारा माजी क्रिकेटर सनथ जयसुर्या (Sanath Jayasuriya) याच्यावर आयसीसीने (ICC) भ्रष्टाचाराविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. त्याचसोबत जयसूर्या याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
आयसीसीच्या भ्रष्टाचाराविरोधात जयसूर्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची मान्यता त्याने दिली आहे. त्यामुळे आयसीसीकडून जयसूर्या ह्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच मॅच फिक्सिंग मध्ये जयसूर्या दोषी आढळल्याचे घटना समोर आली. याबाबत श्रीलंकेतील एका वेबसाईटने दावा केला असून श्रीलंकेच्या आणखी सात खेळाडूंचा समावेश असल्याचे ही म्हटले आहे.
BREAKING: Sanath Jayasuriya has been banned from all cricket for two years after admitting breaching two counts of the ICC Anti-Corruption Code.https://t.co/6VdTP6I2jL
— ICC (@ICC) February 26, 2019
श्रीलंकन क्रिकेट संघावर मॅच फिक्सिंग आणि पिच फिक्सिंग प्रकरणी आरोप लावले गेले होते. याबाबत आयसीसीचे लाचलुचपत विभागाने तपास करण्यास सुरुवात केली होती. या तपासाचा अहवाल नुकताच सादर करण्यात आला असून श्रीलंका पंतप्रधान आणि आयसीसीकडे याबाबत अहवाल देण्यात आला आहे. तसेच अल जझीरा चॅनलच्या हाती हा अहवाल लागला असून त्यांनी दोषी खेळाडूंची नावे समोर आणली आहेत.