भूतानच्या क्रिकेट टीमला सचिनने दिली भेट ; शेअर केला खास फोटो
सचिनची भूतान भेट (Photo Credits: Twitter @Sachin_RT)

मास्टर बास्टर सचिन तेंडूलकर अनेक क्रिकेटर्ससाठी प्रेरणास्थानी आहे. अलिकडेच सचिनने भूतानला भेट देऊन तिथल्या क्रिकेट टीमची भेट घेतली. सचिनने त्यांना शुभेच्छा दिल्या आणि एक छानसा फोटो ट्विटरवर शेअर केला.

फोटोत सचिन नवोदीत खेळाडूंना किक्रेटच्या काही टिप्स देताना दिसत आहे. त्याच्या हा अनुभव त्याने ट्विटर पोस्टमध्ये शेअर केला आहे. त्यात तो म्हणतो, "क्रिकेट खेळण्यापेक्षा पहाडांमध्ये क्रिकेट खेळण्यात अधिक गंमत आहे. भूतान क्रिकेट टीमसोबत खेळणे आनंददायी होते. भविष्यासाठी त्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा."

अलिकडेच सचिन तेंडूलकरला वेस्ट इंडीजच्या ब्रायन लारासोबत स्पॉट करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी एका मित्राच्या घरी सरप्राईज व्हिझिट केली. या दोन दिग्गजांनी विकेंड एकत्र घालवला.