'क्रिकेटचा देव' (God Of Cricket) म्हणून ओळखल्या जाणार्या सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा आज 47 वा वाढदिवस आहे. आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेट सुरु होऊन 39 वर्षे झाली होती, 2962 आंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळले गेले, परंतु 50 षटकांच्या आंतरराष्ट्रीय पुरुष सामन्यात कधीही कोणत्याही फलंदाजाने दुहेरी शतक केले नव्हते. वनडे सामन्यात 200 हे एक अज्ञात क्षेत्र होते आणि तेंडुलकर दुहेरी शतक करणारा पहिला फलंदाज ठरला. 24 फेब्रुवारी 2010 रोजी ग्वाल्हेर येथे दक्षिण आफ्रिकेविरूद्ध (South Africa) 200 हे सचिनच्या कारकीर्दीतील एक वैशिष्ट्य आहे. आज, तेंडुलकरच्या वाढदिवशी, जेव्हा मास्टर ब्लास्टर 47 वर्षांचे होत आहेत, पाहूया त्यांच्या 'सुपरमॅन' कामगिरीकडे एक नजर टाकूया. त्याच्या आधी अनेक फलंदाज 200 धावांच्या टप्प्यावर पोहोचले पण कोणताही फलंदाज तो जादूई आकडा पार करु शकला नाही. दुसरीकडे, सचिनने वनडे क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावले तेव्हा वनडेमध्ये दुहेरी शतकं करण्याचा सिलसिला सुरु झाला. (Happy Birthday Sachin Tendulkar: 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर याचे 'हे' 5 आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड फलंदाजांना करावा लागणार कठोर परिश्रम)
ग्वाल्हेरमधील कॅप्टन रूपसिंग स्टेडियमवर भारताने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीविरुद्ध पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. चार ओव्हरच्या आत सचिनने आपला सलामीचा जोडीदार वीरेंद्र सहवागला अवघ्या 25 धावांवर गमावले. त्यानंतर दिनेश कार्तिकसह सचिनने दुसऱ्या विकेटसाठी 194 धावांची भागीदारी केली. सचिनने अवघ्या 37 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर 90 चेंडूंत शतक पूर्ण केले. कार्तिकच्या बाद झाल्यानंतर यूसुफ पठाणने सचिन सोबत तिसर्या विकेटसाठी त्याने 81 धावांची भागीदारी केली. सचिनने 28 चेंडूत 150 धावांचा टप्पा गाठला आणि त्यानंतर 29 चेंडूत दुहेरी शतक पूर्ण केले. विशेष म्हणजे सचिनने भारताच्या डावाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 200 धावा पूर्ण केल्या.
जादुई क्षण !!!
#OnThisDay in 2010, @sachin_rt created history by becoming the 1st batsman to score a 200 in ODIs. 🇮🇳👏
Relive the knock 👉 https://t.co/yFPy4Q1lQB pic.twitter.com/F1DtPmo2Gm
— BCCI (@BCCI) February 24, 2020
सचिनच्या नाबाद 200 धावांच्या जोरावर भारताने 401 स्कोर उभारला आणि भारताने 153 धावांनी सामना जिंकला. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हा एक ऐतिहासिक क्षण होता. त्यावेळी तेंडुलकरने झिम्बाब्वेच्या चार्ल्स कॉव्हेंट्री आणि पाकिस्तानच्या सईद अन्वर यांनी एकत्रितपणे केलेल्या 194 वैयक्तिक धावांचा विक्रम मोडला. सचिनच्या दुहेरी शतकानंतर वनडे क्रिकेटमध्ये आजवर आणखी सात दुहेरी शतके ठोकली गेली असून यातील तीन रोहित शर्माने ठोकले आहेत.