SA vs ENG ODI 2020: इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघ जाहीर; क्विंटन डी कॉक कर्णधार, फाफ डु प्लेसिस Out
क्विंटन डी कॉक (Photo Credit: PTI)

इंग्लंडविरुद्ध (England) आगामी वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) संघाचा कर्णधार म्हणून क्विंटन डी कॉक (Quinton de Kokc) याची नियुक्ती करण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्ध पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत तो संघाचे नेतृत्व करणार आहे. या संघात पहिल्यांदा लुथो सिपमला, सिसंदा मॅगाला, बोर्न फोर्टुइन, जॅन्नेमन मालन आणि काइल व्हेर्रिन या पाच नवीन खेळाडूंचा समावेश झाला आहे. मात्र, वनडे मालिकेआधी दोन्ही संघात 4 सामन्यांची टेस्ट मालिकेतील अंतिम सामना खेळला जाणार आहे. वांडरर्स स्टेडियम हा सामना खेळला जाईल. तिसरा सामना जिंकून इंग्लंडने मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. यानंतर 4 फेब्रुवारीपासून दोन्ही संघ वनडे मालिका खेळतील. मागील वर्षीच्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेपासून इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका एकही वनडे सामना खेळू शकले नाहीत. इंग्लंडने विश्वचषक जिंकला, तर आफ्रिका संघ विश्वचषकच्या ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला. (SA vs ENG Test 2020: जो रुट याची विकेट घेतल्यानंतर आक्रामक सेलिब्रेशनसाठी कागिसो रबाडाविरुद्ध ICC ने केली कारवाई, वांडरर्स सामन्यातून आऊट)

डी कॉक संघाचे नेतृत्व करेल, तर फाफ डु प्लेसिसला (Faf du Plessis0 संघातून डच्चू देण्यात आलं आहे. ड्यू प्लेसिस सध्या दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाचा कर्णधार आहे. शिवाय, कागिसो रबाडाला विश्रांती देण्यात अली आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध टेस्ट मालिकेनंतर तो कदाचित कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करू शकेल असे विधान ड्यू प्लेसीने केले आहे. तो म्हणाला की इंग्लंडविरुद्ध चौथी कसोटी घरच्या मैदानावरील खेरची असू शकते. योगायोग म्हणजे रबाडा अखेरचा सामना खेळणार नाही. आयसीसीने त्याच्यावर सामन्यासाठी गैरव्यहाराबद्दल एका सामन्याची बंदी घातली आहे. वनडे मालिका संपल्यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जातील. पहिला सामना 12 फेब्रुवारी रोजी पूर्व लंडनमध्ये खेळला जाईल.

दक्षिण आफ्रिकेचा वनडे संघः

क्विंटन डी कॉक (कॅप्टन), रीजा हेंड्रिक्स, तेम्बा बवुमा, रस्सी व्हॅन डर ड्यूसेन, डेव्हिड मिलर, जोन-जोन स्मट्सं, आदिले फेहलुकवायो, लुथो सिपामला, लुंगी नगीदी, तबरेज शम्सी,सीसंडा मगला, ब्योर्न फोर्टुइन, ब्युरन हेन्ड्रिक्स, जनमन मालन आणि काइल वेरिन.