Andre Russell (Photo Credit- X)

KKR vs RR IPL 2025 53rd Match: आयपीएल 2025 चा 53वा (IPL 2025) सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (KKR vs RR) यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्लेऑफच्या शर्यतीचा विचार करता कोलकातासाठी हा सामना जिंकणे खूप महत्वाचे आहे. तर राजस्थान रॉयल्स संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. कोलकाता 10 सामन्यांतून चार विजयांसह पॉइंट टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहे. तर, राजस्थान रॉयल्स संघ 11 सामन्यांत 3 विजयांसह आठव्या स्थानावर आहे. आता हा सामना कोणता संघ जिंकतो हे पाहणे रंजक ठरेल. दरम्यान, कोलकताने राजस्थानसमोर 20 षटकात 207 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकांत 4 गडी गमावून 206 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून आंद्रे रसेलने 55 धावांची स्फोटक खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, त्याने 25 चेंडूत चार चौकार आणि सहा षटकार मारले. आंद्रे रसेल व्यतिरिक्त, अंगकृष रघुवंशीने 44 धावांची शानदार खेळी केली.

दुसरीकडे, घातक वेगवान गोलंदाज युद्धवीर सिंगने राजस्थान राॅयल्स संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. राजस्थान राॅयल्सकडून युधवीर सिंग, जोफ्रा आर्चर, एम थेक्षाना आणि रियान परागने प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी राजस्थान राॅयल्स संघाला 20 षटकांत 207 धावा कराव्या लागतील. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेत दोन गुण मिळवायचे आहेत.