RR vs SRH, IPL 2020: सनरायजर्स हैदराबादचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; दुखापतीमुळे केन विलियम्सन आऊट, जेसन होल्डरला संधी
डेविड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ (Photo Credit: PTI)

RR vs SRH, IPL 2020: आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 40 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद आमने-सामने येतील. दोन्ही संघांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आजचा सामना जिंकणे आवश्यक आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. आजच्या सामन्यात सनरायजर्सचा कर्णधार डेविड वॉर्नरने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यासाठी सनरायजर्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल झाले आहेत, तर रॉयल्सच्या अंतिम-11 मध्ये कोणताही बदल झालेला नाही. राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघासाठी आता प्ले-ऑफ गाठण्यासाठी सर्व सामने जिंकणे आवश्यक झाले आहे. राजस्थान संघाने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध अखेरचा सामना जिंकला असून चांगली कामगिरी करत आहे. (RR vs SRH, IPL 2020 Live Streaming: राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)

बेन स्टोक्स आणि रॉबिन उथप्पा हे पुन्हा संघासाठी सलामीला येतील, तर मधल्या फळीत कर्णधार स्टिव्ह स्मिथ, संजू सॅमसन, जोस बटलर, राहुल तेवतिया, रायन पराग दिसतील. जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, कार्तिक त्यागी आणि अंकित राजपूत गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील. दुसरीकडे, हैदराबाद संघासाठी सर्व काही ठीक होत नाही. केन विल्यमसनला मागील सामन्यात दुखापत झाली होती, ज्यामुळे आजच्या सामन्यात हैदराबादने त्याच्या जागी जेसन होल्डरला संधी दिली आहे. होल्डरचा यंदाच्या आयपीएलमधील पहिला सामना असेल. विलियम्सनऐवजी हैदराबादने बासिल थंपीच्या जागी शहबाज नदीमला संधी दिली आहे.

पाहा राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबादचा प्लेइंग इलेव्हन

राजस्थान रॉयल्स: जोस बटलर, बेन स्टोक्स, रॉबिन उथप्पा, स्टिव्ह स्मिथ (कॅप्टन), संजू सॅमसन, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, रियान पराग, जोफ्रा आर्चर, अंकित राजपूत, कार्तिक त्यागी.

सनरायजर्स हैदराबाद: डेविड वॉर्नर (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), मनीष पांडे, दिपक हुडा, प्रियम गर्ग, जेसन होल्डर, अब्दुल समद, विजय शंकर, राशिद खान, संदीप शर्मा, टी नटराजन आणि शहबाज नदीम.