RR vs SRH, IPL 2020 Live Streaming: राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर
राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद (Photo Credit: File Image)

RR vs SRH, IPL 2020 Live Streaming: आयपीएलच्या (IPL) 13व्या सत्रात दुबई येथे सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderbad) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघांना स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी आजच्या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. पॉईंट टेबलमध्ये राजस्थान 8 गुणांसह सहाव्या आणि हैदराबाद 6 गुणांसह 7व्या क्रमांकावर आहे. तथापि लीगमध्ये राजस्थानने आजवर 10 सामने खेळले आहेत तर हैदराबादने 9 सामने खेळले आहेत. राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार आज, 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता टॉस होणार असून सामना 7.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Disney+ Hotstar अ‍ॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत. ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (IPL 2020 Points Table Updated: KKR विरुद्ध विजयानंतर RCB संघाची आयपीएलच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप; पाहा इतर संघाची स्थिती)

मागील सामन्यात राजस्थानने हैदराबादला 5 गडी राखून पराभूत केले होते. अष्टपैलू राहुल तेवतिया आणि युवा फलंदाज रियान परागने हैदराबादच्या हातून सामना खेचला. राजस्थानकडून अनुभवी फलंदाज जॉस बटलर आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथने या हंगामात सर्वाधिक धावा केल्या आहेत. याशिवाय युवा फलंदाज संजू सॅमसनने 10 सामन्यांत 236 धावा केल्या आहेत. राजस्थानकडून जोफ्रा आर्चर आणि राहुल तेवतिया यांनी सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. दुसरीकडे, सनरायजर्सची सलामी जोडी डेविड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी सर्वाधिक धावा आहेत, तर फिरकीपटू राशिद खान आणि टी नटराजन यांनी प्रभावी गोलंदाजी केली आहे.

पाहा राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद संघ

राजस्थान रॉयल्स: स्टिव्ह स्मिथ (कॅप्टन), डेविड मिलर, मनन वोहरा, रियान पराग, रॉबिन उथप्पा, शशांक सिंह, यशस्वी जयस्वाल, बेन स्टोक्स, महिपाल लोमरोर, श्रेयस गोपाल, टॉम कुरन, अनुज रावत, जोस बटलर, संजू सॅमसन, आकाश सिंह, अँड्र्यू टाय, अनिरुद्ध जोशी, अंकित राजपूत, जयदेव उनाडकट, जोफ्रा आर्चर, कार्तिक त्यागी, मयंक मार्कंडे, ओशाने थॉमस, राहुल तेवतिया, वरुण आरोन.

सनरायजर्स हैदराबाद: डेविड वॉर्नर (कॅप्टन), जॉनी बेयरस्टो, केन विल्यमसन, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराट सिंह, प्रियम गर्ग, रिद्धिमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, रशीद खान, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, बी संदीप, संजय यादव, फॅबियन अ‍ॅलेन, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टॅनलेक, टी नटराजन, बासिल थंपी.