RR vs SRH, IPL 2019: राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद संघाचा लाईव्ह सामना पाहा Star Sports आणि Hotstar Online वर
RR vs SRH, IPL 2019 (Photo Credits-File Image)

RR vs SRH: आज (27 एप्रिल) राजस्थान मधील सवाई मान सिंह स्टेडियमवर (Sawai Mansingh Stadium) राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध सनराईज हैदराबाद (SRH) संघाचा सामना रंगणार आहे. तर राजस्थानचा संघ हा शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे. आज या दोन्ही संघाचा लाईव्ह सामना Star Sports आणि Hotstar Online वर पाहता येणार आहे.

आजच्या सामन्यात राजस्थान संघातील बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर खेळणार नाही आहेत. कारण वर्ल्डकपसाठी हे दोघेजण इंग्लड येथे रवाना झाले आहेत. तर हैदराबाद संघातील जॉनी बेयरस्टो सुद्धा आजचा सामना खेळणार नाही आहे. राजस्थानच्या संघाने कोलकाता विरुद्धच्या सामन्यात उत्तम खेळी करत विजय मिळवला होता. संघाचा कर्णधार स्टीवन स्मिथ आणि अजिंक्य रहाणे यांच्यावर गोलंदाजीची मुख्य जबाबदारी राहणार आहे.(महिला आयपीएल मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ खेळणार नाही)

कुठे पहाल लाईव्ह सामना आणि स्कोअर?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनराईज हैदराबाद संघाचा सामाना टीव्हीप्रमाणे ऑनलाईन माध्यमातून पाहता येणार आहे. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी येथे क्लिक करा. तर या सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

संभावित खेळाडूंचा संघ-

राजस्थान रॉयल्स: अजिंक्य रहाणे, कृष्णप्पा गौतम, संजू सैमसन, श्रेयस गोपाल, आर्यमान बिड़ला, एस. मिधुन, प्रशांत चोपड़ा, स्टुअर्ट बिन्नी, राहुल त्रिपाठी, स्टीव स्मिथ (कर्णधार), जोफ्रा आर्चर, ईश सोढ़ी, धवल कुलकर्णी, महिपाल लोमरोर, जयदेव उनादकट, वरुण एरॉन, ओशेन थॉमस, शशांक सिंह, लियाम लिविंगस्टोन, शुभम रंजाने, मनन वोहरा, एश्टन टर्नर, रियान पराग.

सनराइजर्स हैदराबाद: केन विलियम्सन (कर्णधार) भुवनेश्वर कुमार, डेविड वार्नर, अभिषेक शर्मा, जॉनी बेयरस्टो, खलील अहमद, रिकी भुई, बासिल थम्पी, श्रीवत्स गोस्वामी, मार्टिन गुप्टिल, दीपक हुड्डा, सिद्धार्थ कौल, मोहम्मद नबी, शहबाज नदीम, टी. नटराजन, मनीष पांडे, यूसुफ पठान, राशिद खान, रिद्धिमान साहा, संदीप शर्मा, विजय शंकर, शाकिब अल हसन और बिली स्टानलेक.