महिला आयपीएल मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ खेळणार नाही
Indian Premier League | IPL 2019 | (Photo Credits: Twitter @IPL)

पुरुषांच्या क्रिकेट मालिकेच्या पुनर्आखणीबद्दल सध्या बीसीसीआय (BCCI) सोबत वाद सुरु आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ महिला आयपीएलमध्ये खेणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

6 ते 11 मे या कालावधीत जयपूर येथे तिरंगी स्पर्धा होणार आहे. तर क्रिकेट ऑस्ट्रेलिया वेठीस धरत असल्याचा आरोप बीसीसीआयकडून करण्यात आला आहे. मेग लॅनिंग, एलिस पेरी आणि एलिसा हिली या तिघींना आयपीएलमध्ये खेळण्यास ऑस्ट्रेलियाने मज्जाव केला.(महिलांच्या मिनी IPL स्पर्धेला 6 मे पासून सुरुवात होणार, जाणून घ्या वेळापत्रक)

तर पुरुषांची एकदिवसीय मालिका पुढे करण्यात यावी असे म्हणण्यात येत आहे. त्यासाठी बीसीसीआयवर दबाब आणण्याच्या हेतूने ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ अधिकारी बेलिंडा क्लार्क यांनी ईमेल पाठवला आहे.