महिलांच्या मिनी IPL स्पर्धेला 6 मे पासून सुरुवात (फोटो सौजन्य-ट्वीटर)

बीसीसीआयने (BCCI) महिलांसाठी मिनी आयपीएलचे (IPL) सामने खेळवण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला असून त्याबद्दल घोषणा करण्यात आली आहे. तर 6 ते 11 मे दरम्यान तीन संघामध्ये आयपीएलचा सामना खेळवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जयपूर (Jaipur) येथील सवाई मानसिंग स्टेडिअमवर (Sawai Mansingh Stadium) हे सामने खेळवण्यात येणार असून त्यामध्ये भारतामधील आणि जगातील अव्वल क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत.

सुपरनोव्हाज, ट्रेलब्लेझर्स आणि व्हेलॉसिटी असे तीन संघ या महिला मिनी आयपीएलसाठी खेळणार आहेत. तर तीन संघ एकमेकांत चुरशीची खेळी करत अंतिम सामन्यात दोन संघ एकमेकांना टक्कर देणार आहेत.(महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! मराठमोळी स्मृती मानधना यंदाची सर्वोत्तम क्रिकेटपटू)

असे आहे वेळापत्रक:

6 मे- सुपरनोव्हाज विरुद्ध ट्रेलब्लेझर्स

8 मे- ट्रेलब्लेझर्स विरुद्ध व्हॅलोसिटी

9 मे- सुपरनोव्हाज विरुद्ध व्हॅलोसिटी

11 मे- अंतिम सामना

तर यापूर्वी महिलांसाठी आयपीएलचे सामने खेळवण्यात आले होते. त्यावेळी स्मृती मानधना हिचा ट्रेलब्लेझर्स आणि हरमनप्रीत कोरचा सुपरनोव्हाज संघ यामध्ये सामना रंगला होता. त्यामध्ये मेग लॅनिंग, एलिस पेरी, बेथ मूनी आणि सोफी डेव्हीयन सारख्या दिग्गज खेळाडू यामध्ये सहभागी झाल्या होत्या. तर मिनी महिला आयपीएल सामन्याचेसुद्धा थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.