आयपीएल 2021च्या (IPL 2021) रणसंग्रामाला आता खऱ्या अर्थाने रंग चढू लागला आहे. या हंगामातील 3 सामन्यानंतर पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स (Panjab kings Vs Rajasthan Royals) हे दोन संघ आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या पंजाबच्या संघाने राजस्थानसमोर 20 षटकात 6 बाद 221 धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानच्या संघाला 4 धावांनी पराभव पत्कारावा लागला आहे.
पंजाबचा कर्णधार केएल राहुल, ख्रिस गेल, दिपक हुड्डाने दमदार फलंदाजी केली. ज्यामुळे पंजाबच्या संघाने 221 धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात के.एल राहुलचे केवळ 9 धावांनी शतक हुकले आहे. त्याने 50 चेंडूत 91 धावांची खेळी केली आहे. यात 5 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश आहे. राजस्थानकडून 8 गोलंदाजांनी षटके टाकली. चेतन साकारियाने 3, ख्रिस मॉरिसने 2 बळी घेतले. हे देखील वाचा- RR vs PBKS 4th Match: आयपीएल 2021 मधील पहिल्याच सामन्यात Chris Gayle याने रचला षटकारांचा विक्रम
ट्वीट-
#IPL2021: Punjab Kings beat Rajasthan Royals by 4 runs pic.twitter.com/1EXlTOgERt
— ANI (@ANI) April 12, 2021
पंजाबच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही. राजस्थानच्या संघाचे झटपट विकेट गेल्यामुळे राजस्थानचा संघ डगमताना दिसला. मात्र, सामना गमावला असे वाटत असताना राजस्थानच्या संघाने तडाखेबाज फलंदाजी केली. ज्यामुळे राजस्थानच्या अपेक्षा पुन्हा जाग्या झाल्या. परंतु, सामन्याचा शेवट गोड करण्यास संजू सॅमसनला यश आले नाही. तसेच त्याची शतकी खेळी व्यर्थ गेली आहे. पंजाबकडून अर्शदीपने 3 तर, मोहम्मद शमीने 2 बळी घेतले.