RR vs PBKS 4th Match: आयपीएल 2021 मधील पहिल्याच सामन्यात Chris Gayle याने रचला षटकारांचा विक्रम
Chris Gayle (Photo Credit: ANI)

भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या चौदाव्या हंगामाला (IPL 14) 9 तारखेपासून सुरुवात झाली आहे. या हंगामातील 3 सामने पार पडले आहेत. दरम्यान, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज (RR vs PBKS) यांच्यात आज (12 एप्रिल) वानखेडे स्टेडिअमवर चौथा सामना खेळला जात आहे. या सामन्यात पंजाब किंग्जचा तडाखेबाज खेळाडू ख्रिस गेलने (Chris Gayle) नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल संघाविरुद्ध 350 वा षटकार ठोकला आहे. ख्रिस गेलने केलेल्या या कामगिरीचे क्रिडा विश्वातून कौतूक केले जात आहे.

पंजाब विरुद्ध सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या पंजाबच्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली आहे. या सामन्यात ख्रिस गेलने 28 चेंडूत 40 धावा ठोकल्या आहेत. यातच 2 षटकार आणि 4 चौकाराचा समावेश आहे. हे देखील वाचा- RR vs PBKS 4th Match: रियान परागने टाकलेला चेंडू पाहून ख्रिस गेलही झाला हैरान; पाहा व्हिडिओ

ट्वीट-

कोरोनाच्या संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी यूईएमध्ये आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. सध्या संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट वावरत असल्यामुळे यावर्षीही आयपीएल बंद दरवाज्यामागे खेळवली जात आहे.