RR Vs MI 20th IPL Match 2020 Live Streaming: राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर
Rajastan Royals Vs Mumbai Indians (Photo Credit: Twitter)

आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 20व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Rajastan Royals Vs Mumbai Indians) आज एकमेकांशी भिडणार आहेत. आबूधाबी येथील शेख जायद स्टेडियमवर (Shaikh Zayed Stadium) हा सामना पार पडणार आहे. राजस्थान रॉयल संघाचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्वीव्ह स्मिथ करत आहे. तर, मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधार पद भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा संभाळत आहे. भारतीय वेळेनुसार, आज 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता टॉस होणार असून सामना 7.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Disney+ Hotstar अ‍ॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात.

राजस्थान आणि मुंबईच्या संघाने या हंगामात चांगले प्रदर्शन करुन दाखवले आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने गेल्या सामन्यात विजय मिळवला होता. तर, राजस्थानच्या संघाला मागील दोन्ही सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. महत्वाचे म्हणजे मुंबईच्या संघाने या हंगामात पाच सामने खेळून तीन सामन्यात विजय मिळवला आहे. तर, राजस्थानच्या संघाने आतापर्यंत खेळले गेलेल्या चार सामन्यांपैकी दोन सामन्यात विजय मिळवला असून दोन सामन्यात पराभूत झाले आहे. यामुळे आजचा सामना राजस्थानच्या संघासाठी महत्वाचा ठरणार आहे. हे देखील वाचा-IPL 2020 Orange Cap Holder List Updated: श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ यांचा पहिल्या पाचमध्ये समावेश; किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार केएल राहुल अव्वल स्थानी कायम

संघ-

मुंबई इंडियन्सः रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), ईशान किशन, किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, क्रुणाल पंड्या, जेम्स पॅटिनसन, राहुल चहर, ट्रेंट बाउल्ट, जसप्रीत बुमराह

राजस्थान रॉयल्स: जोस बटलर (यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, रॉबिन उथप्पा, संजू सॅमसन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), रियान पराग, महिपाल लोमरोर, टॉम करन, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ, जयदेव उनाडकट, वरुण आरोन