RR vs MI, IPL 2020: संजू सॅमसन, बेन स्टोक्सचा मुंबई इंडियन्सवर हल्लाबोल! राजस्थान रॉयल्सने Table-Toppers वर 8 विकेटने केली मात
बेन स्टोक्स, संजू सॅमसन (Photo Credit: PTI)

RR vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) आजच्या सामन्यात पहिले फलंदाजी करून दिलेल्या 196 धावांच्या प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) सलामी फलंदाज बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) यांच्या दीडशतकी भागीदारीच्या जोरावर आयपीएल (IPL) गुणतालिकेत पहिल्या स्थानावरअसलेल्या मुंबईवर 8 विकेट आणि 10 चेंडू शिल्लक असताना मात केली. आजच्या सामन्यात मुंबईने पहिले फलंदाजी करत ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि अखेरच्या षटकांत सौरभ तिवारी व हार्दिक पांड्याने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर धावांचा डोंगर उभारला, पण गोलंदाजांनी निराशा केली आणि रॉयल्सने शानदार फलंदाजी करत लक्ष्य गाठले. रॉयल्ससाठी आजच्या सामन्यात स्टोक्सला सूर गवसला आणि त्याने सर्वाधिक नाबाद 107 धावा केल्या. संजू सॅमसनने त्याला चांगली साठी दिली आणि नाबाद 54 धावा केल्या. मुंबईसाठी एकमेव जेम्स पॅटिन्सनने 2 विकेट घेतल्या. (RR vs MI, IPL 2020: संजू सॅमसन, बेन स्टोक्सचा मुंबई इंडियन्सवर हल्लाबोल! राजस्थान रॉयल्सने Table-Toppers वर 8 विकेटने केली मात)

मुंबईने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही. रॉबिन उथप्पा 13 धावा करून पॅटिन्सनच्या चेंडूवर कॅच आऊट झाला तर कर्णधार स्टिव्ह स्मिथला देखील पॅटिन्सनने परतीचा मार्ग दाखवला. पॅटिनसनने स्मिथला 11 धावांवर क्लीन बोल्ड केले. त्यानंतर स्टोक्स आणि सॅमसनची जोडी मुंबईच्या गोलंदाजांवर भारी पडली. दोंघांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत संघाचा विजय निश्चित केला. या दरम्यान स्टोक्सने हंगामातील पहिले अर्धशतक ठोकले. स्टोक्सने 30 चेंडूत दमदार अर्धशतक केले. यांनतर सॅमसनने मोक्याच्या क्षणी 27 चेंडूत अर्धशतक केले. स्टोक्स आणि सॅमसनच्या दीडशतकी भागीदारीसमोर मुंबईचे गोलंदाज निरुत्तर दिसले आणि दोन्ही फलंदाजांनी रॉयल्सना मुंबईवर एकहाती विजय मिळवून दिला.

दरम्यान, मागील तीन सामन्यात पॉईंट्स टेबलवर आघाडीवर असलेल्या तीनही संघांना-मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मात्र, पराभवाचा त्यांना फटका बसला नाही सर्वांनी आपले स्थान कायम ठेवले आहेत. शिवाय, 11 सामन्यांनंतरही एकही संघाने प्ले ऑफसाठी क्वालिफाय केले नाही. अनुक्रमे गुणांसह 14 मुंबई इंडियन्स पॉईंट्स टेबलच्या पहिल्या, दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या तर आरसीबी तिसऱ्या स्थानावर आहे. मुंबईने हा सामना जिंकला असता तर ते प्ले ऑफसाठी पात्र ठरलेला स्पर्धेतला पहिला संघ ठरला असता. राजस्थानच्या विजयामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान कायम राहिले, मात्र चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपुष्टात आले.