RR vs KXIP, IPL 2020: केएल राहुल-मयंक अग्रवाल यांचा 'दे घुमा के! शारजाहवर पडला चौकार-षटकारांचा पाऊस, RR समोर 224 धावांचे विशाल आव्हान
केएल राहुल, मयंक अग्रवाल (Photo Credit: Twitter/lionsdenkxip)

राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Rajasthan Royal) शारजाह क्रिकेट स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्यात टॉस गमावून पहिले फलंदाजी करत केएल राहुलच्या (KL Rahul) किंग्स इलेव्हन पंजाबने (Kings XI Punjab) 20 ओव्हरमध्ये 223 धावा केल्या आणि रॉयल्सला 224 धावांचे लक्ष्य गाठण्याचे आव्हान दिले. सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या (IPL) 13व्या हंगामात पंजाबने सलग दुसऱ्यांदा दोनशे धावांचा टप्पा गाठला आहे. किंग्स इलेव्हनकडून राहुल आणि मयंक अग्रवालच्या (Mayank Agarwal) सलामी जोडीने विक्रमी 183 धावांची भागीदारी केली. राहुलने 69 धावा तर मयंकने 106 धावा केल्या. आजच्या सामन्यात राजस्थानने टॉस जिंकला आणि पंजाबला पहिले फलंदाजी करण्यास सांगितले, पण तो निर्णय चुकीचा ठरला. राहुल आणि मयंकने धमाकेदार सुरुवात केली. राहुल आणि मयंकने राजस्थानच्या गोलंदाजांची क्लास घेतली आणि सलग दुसऱ्यांदा टीमची धावसंख्या दोनशे पार पोहचवली. (IPL 2020 Stat Update: आयपीएलच्या 'डेथ ओव्हर'मध्ये 'या' रन रेटने धावा करून फलंदाज घालतायत धुमाकुळ, आकडे जाणून तुम्हीही व्हाल चकित! )

पंजाबकडून राहुल आणि मयंकने दीडशे धावांच्या भागीदारीसह अर्धशतकी वैयक्तिक धाव देखील खेळला. मयंक आणि राहुलने पंजाबकडून आक्रमक सुरुवात केली. यादरम्यान मयंकने 26 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले तर राहुलने 25 चेंडूत पन्नास धावा केल्या. मयंकचे आयपीएलमधील हे 7वे तर राहुलचे 17वे अर्धशतक ठरले. यापूर्वी मयंकने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अर्धशतक केले होते. दुसरीकडे, राहुलने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध नाबाद 132 धावांचा डाव खेळला. बेंगलोरविरूद्ध मागील सामन्यातदेखील राहुलने तुफान फटकेबाजी केली आणि 69 चेंडूत नाबाद 132 धावा कुटल्या होत्या. मयंक आणि राहुलच्या जोडीसमोर राजस्थान रॉयल्सचे गोलंदाज-जोफ्रा आर्चर, टॉम कुरन, जयदेव उनादकट देखील निरुत्तर दिसले. मयंकने 45 चेंडूत आयपीएलमधील पहिले शतक ठोकले. आयपीएलमधील पंजाबकडून मयंकने दुसरे सर्वाधिक शतक ठोकले. यापूर्वी, डेविड मिलरने 38 चेंडूत 2013मध्ये शतकी डाव खेळला होता. 183 धावांवर करने पंजाबला पहिला धक्का दिला आणि मयंक 106 धावांवर माघारी परतला. त्यानंतर 194 च्या धावसंख्येवर अंकित राजपूतने राहुलला 69 धावांवर माघारी धाडले.

दुसरीकडे, राहुलने राजस्थानचा सर्वोत्तम गोलंदाज आर्चरलाही सोडलं नाही. आर्चर आपली पहिली ओव्हर टाकण्यासाठी आला तेव्हा पंजाबने 28 धावा केल्या होत्या. आर्चरच्या गोलंदाजीचा राहुलने त्याच्या गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेतला आणि पहिले तीनेही चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवत चौकारांची हॅटट्रिक केली.