RR vs KKR IPL 2021 Match 18: संजू समसनने जिंकला टॉस, राजस्थानचा पहिले गोलंदाजीचा निर्णय; संघात केले 2 मोठे बदल
इयन मॉर्गन (Photo Credit: Twitter/IPL)

RR vs KKR IPL 2021 Match 18: संजू सॅमसनचे (Sanju Samson) राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि इयन मॉर्गनच्या कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 14 चा 18 वा सामना खेळला जाणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर राजस्थान आणि कोलकाता संघात सामना रंगणार आहे. आजच्या सामन्यापूर्वी राजस्थानचा कर्णधार सॅमसनने टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी रॉयल्सने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत नाईट रायडर्समध्ये देखील एक बदल पाहायला मिळत आहे. दोन्ही संघाची स्थिती सध्या एकसारखी आहे. राजस्थान व कोलकाता संध्या गुणतालिकेत तळाशी आहे. नाईट रायडर्सने सलग तीन तर रॉयल्स संघाला मागील दोन सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे यामुळे या सामन्यात नक्की कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचच लक्ष असणार आहे. (IPL 2021: ‘तो भारतीय संघात नसण्यामागे हे एक कारण आहे,’ Sanju Samson याच्या ‘फ्लॉप शो’ वर संतप्त Sunil Gavaskar यांनी दिली मोठी प्रतिक्रिया)

राजस्थानने आजच्या सामन्यासाठी मनन वोहरा आणि श्रेयस गोपाल यांना बाहेर केले असून त्यांच्या जागी यशस्वी जयस्वाल व जयदेव उनाडकटचा समावेश केला आहे. म्हणजे रॉयल्सकडून जोस बटलरसोबत भारताचा युवा फलंदाज जयस्वाल सलामीला उतरेल. दुसरीकडे, कोलकाताने युवा गोलंदाज कमलेश नागरकोटीच्या जागी शिवम मावीला संधी दिली आहे. दोन्ही संघाच्या आजवरच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर राजस्थान आणि कोलकाता आयपीएलमध्ये आतापर्यंत 23 वेळा आमनेसामने भिडले असून 12 सामन्यात कोलकाताने तर राजस्थानने 10 वेळा विजय मिळवला आहे.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन: संजू सॅमसन (कॅप्टन/विकेटकीपर), जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे, डेविड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, क्रिस मॉरिस, जयदेव उनाडकट, चेतन सकारिया आणि मुस्ताफिजूर रहमान.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन: इयन मॉर्गन (कॅप्टन), शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, पॅट कमिन्स, सुनील नारायण/लोकी फर्ग्युसन, शिवम मावी, प्रसिद्ध कृष्णा आणि वरुण चक्रवर्ती.