IPL 2021: ‘तो भारतीय संघात नसण्यामागे हे एक कारण आहे,’ Sanju Samson याच्या ‘फ्लॉप शो’ वर संतप्त Sunil Gavaskar यांनी दिली मोठी प्रतिक्रिया
संजू सॅमसन (Photo Credit: IANS)

IPL 2021: हंगामाच्या पहिल्या सामन्यात शतक आणि त्यानंतर 4, 1 आणि 21 धावा. इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 मोसमात संजू सॅमसन (Sanju Samson) राजस्थान रॉयल्सचा  (Rajasthan Royals) कर्णधार असेल पण त्याच्या या कामगिरीमुळे त्याच्या सहकारी आणि चाहत्यांना खूप इच्छा होती. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) विरोधात मुंबईत झालेल्या सामन्यात पुन्हा अपयशी ठरल्यानंतर सॅमसनवर अनेक समर्थकांना सोशल मीडियावर भडकले तर भारताचे महान कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनीही फलंदाजांच्या दृष्टिकोनातून काही क्षणांवर प्रकाश टाकला ज्यामुळे तो लवकर आऊट होतो. पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केल्यानंतर मागील तीन सामन्यात सॅमसन पूर्णपणे निराश केले आहे. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना गावस्कर म्हणाले की कर्णधार म्हणून सॅमसनला 'उभे राहून कामगिरी करणे' आवश्यक आहे परंतु जणू तो मागील सामान्यापासून फलंदाजी करत आहे असे वाटते, जो की एक मुद्दा बनला आहे. (RCB vs RR IPL 2021 Match 16: ‘विराटसेने’ची विजयी घोडदौड कायम, कोहली- शतकवीर पडिक्क्लच्या वादळी खेळीमुळे बेंगलोरचा राजस्थानला 10 विकेट्सने धोबीपछाड)

“सर्वप्रथम, कर्णधारांना उभे राहून खेळावे लागते. पहिल्या सामन्यात त्याने हे केले पण हीच त्याची समस्या निर्माण झाली. भारतीय संघात त्याला नियमित स्थान न देण्यामागे हे एक कारण आहे की तो पहिल्या मॅचमध्ये धावा करतो आणि तर पुढच्या सामन्यात त्याच सामन्यातून तो फलंदाजी करत आहे असे पुढे जातो, आणि अशाच प्रकारे तो आऊट होत राहतो,” गावस्कर म्हणाले. भारतीय फलंदाज दिग्गजाने राजस्थान संघातील उणीवा देखील दाखवल्या. संघात दर्जेदार फिनिशर नसल्यामुळे, खराब सुरूवातीमुळेही संघाला फारसा फायदा झाला नाही.

“म्हणूनच, मला असे वाटते की कर्णधार उदाहरणा ठेवत नेतृत्व करतो, कर्णधार धावा करतो कारण तो संघातील एक क्लास व्यक्ती आहे… हो, डेविड मिलर आहे, तिथे क्रिस मॉरिस आहे जे आक्रमक फलंदाजी करु शकतात परंतु आघाडीवर बरोबर करणे आवश्यक आहे कारण त्यांच्या 5, 6 आणि 7व्या स्थानावर थोडी समस्या आहे. त्यांच्याकडे खरोखरच कोणतेही फिनिशर नाही आहे आणि म्हणूनच आघाडीवर कर्णधाराने आपल्याला बऱ्याच धावा मिळवून देणे महत्वाचे आहे,” गावस्कर यांनी निदर्शनास आणून दिले. दरम्यान, राजस्‍थानने आयपीएलमध्ये आतापर्यंत चार सामने खेळले आहेत ज्यापैकी केवळ एकाच सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे त्यामुळे गुणतालिकेत ते सध्या तळाशी बसलेले आहेत.